कुलदीप यादवची झेप, ‘आयसीसी’च्या टी-20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानी

11


सामना ऑनलाईन । दुबई

‘टीम इंडिया’चा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने ‘आयसीसी’ने सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या टी-20 क्रिकेटमधील गोलंदाजी क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्तम दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. या आधी त्याने तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. याचबरोबर ‘टीम इंडिया’चा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मानेही तीन स्थानाने झेप घेतली असून विश्रांती करत असलेला ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीची चार स्थानाने घसरण झाली आहेय

कुलदीप यादवने ‘आयसीसी’च्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीत 728 गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. अफगाणिस्तानचा राशिद खान 793 गुणांसह या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. कुलदीपने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 26 धावांत 2 बळी टिपले. त्याने आतापर्यंत 18 टी-20 सामन्यात 35 फलंदाज बाद केले आहेत. सरासरी तेराव्या चेंडूवर कुलदीप एक गडी बाद करतो.

न्यूझीलंडकिरुद्धच्या टी 20 मालिकेतील पराभकामुळे हिंदुस्थानी संघाच्या गुणांमध्ये घट झाली आहे. ‘टीम इंडिया’चे 2 गुण कमी झाले असून सध्या त्यांचे 124 गुणांकर आहे. दुसरीकडे पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्कराका लागल्याने त्यांचेही 3 गुण कमी झाले आहेत, परंतु दोन्ही संघांच्या क्रमकारीत फरक पडलेला नसून पाकिस्तान आणि हिंदुस्थान अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर कायम आहेत.

कृणालची मोठी उडी
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 4 गडी बाद करणाऱ्या कृणाल पांडय़ाला ‘आयसीसी’च्या गोलंदाजी क्रमवारीत 39 स्थानाचा फायदा झाला असून तो 58व्या क्रमांकावर आला आहे. न्यूझीलंडविरुद्ध विश्रांती देण्यात आलेल्या विराट कोहलीला फलंदाजी क्रमवारीत चार स्थानाचा फटका बसला असून त्याची 19व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. रोहित शर्माने तीन स्थानाने प्रगती करताना सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पाकिस्तानचा बाबर आजम अव्वल स्थानी कायम असून लोकेश राहुलची तीन स्थानाने घसरण होऊन तो दहाव्या क्रमांकावर गेला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या