नवाज शरीफ यांच्या पत्नीचे निधन

सामना ऑनलाईन। लंडन

भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी कुलसुम यांचे लंडनमध्ये दिर्घ आजाराने निधन झाले आहे. ६८ वर्षीय कुलसुम यांना घशाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर लंडनमधील हार्ले स्ट्रीट रुग्णालयात २०१४ पासून उपचार सुरू होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. सोमवारी त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. पण मंगळवारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

कुलसुम यांची तब्येत बरी नसल्याने नवाज शरीफ व त्यांची कन्या मरियम बराचकाळ त्यांच्याजवळ लंडनमध्ये होते. पण पाकिस्तानच्या न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी शरीफ व मरियमला दोषी ठरवल्यानंतर ते दोघे पाकिस्तानात परतले होते. त्यांना विमानतळावरच अटक करण्यात आली होती. सध्या शरीफ व मरियम तुरुंगात असून कुलसुम यांच्या निधनाबदद्ल त्यांना कळवण्यात आले आहे. दरम्यान ,कुलसुम यांचे पार्थिव पाकिस्तानत आणले जाणार असून तिथेच त्यांचा दफनविधी होणार आहे. असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

summary-kulsum-nawaz-wife-of-former-pakistan-pm-nawaz-sharif-has-passed-away