आंध्र प्रदेशमध्ये रेल्वेला अपघात, ३६ ठार

सामना ऑनलाईन । कुनेरू

आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातल्या कुनेरू स्थानकाजवळ जगदलपुर-भुवनेश्वर हीराखंड एक्सप्रेसचे इंजिन आणि सात डबे घसरले. शनिवारी रात्री ११ वाजता झालेल्या या अपघातात ३६ जण ठार झाले आणि १०० पेक्षा जास्त जखमी झाले. गाडी भुवनेश्वरला जात असताना हा अपघात झाला. इंजिन, मालवाहक डबा, दोन सामान्य कोच, दोन स्लीपर कोच, एक एसी थ्री कोच आणि एक सेकंड एसी कोच रुळावरुन घसरल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मदतकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुळावरुन घसरलेले डबे हटवून वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अपघाताचे स्वरुप पाहता मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेल्पलाइन – ०६८५६-२२३४००, ०६८५६- २२३५००, ०९४३९७४११८१, ०९४३९७४१०७१, ०७६८१८७८७७, ८३३३१, ८३३३२, ८३३३३,८३३३४, ०८९२२-२२१२०२, ०८९२२-२२१२०६

अपघात झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीत करण्यात आलेला बदल

railway-press