माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना मातृशोक

सामना प्रतिनिधी । सांगली

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्री कुसुम ताई पाटील यांचं आज पावणेचार वाजता मुंबईत निधन झालं. त्या ९६ वर्षांच्या होत्या. सांगलीचे नेते माजी मंत्री स्व. राजारामबापू पाटील यांच्या पत्नी असणाऱ्या कुसुमताई यांनी राजारामबापूंना मोलाची साथ देत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मागे जयंत आणि भगत हे दोन मुले, एक मुलगी-जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे उद्या शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.