…तर पेटीएम वॉलेट १५ जानेवारीला बंद होणार!

1

सामना ऑनलाईन । मुंबई

रिझर्व्ह बँकेने पेटीएम कंपनीला पेमेंट बँक चालू करण्याचा परवाना दिला आहे. त्यामुळे आता पेटीएम वॉलेट पेटीएम बँकेत हस्तांतरीत होणार असून त्यासाठी १५ जानेवारी तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे येत्या १५ जानेवारीला पेटीएम वॉलेट बंद होणार असल्याची नोटीस कंपनीने जारी केली आहे. पेटीएमचे व्यवस्थापन पाहणा-या वन ९७ कम्युनिकेशन कंपनीने याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्रात नोटीस देऊन माहिती प्रसिद्ध केली आहे. यापुढे पेटीएम वापरासाठी नवे नियम लागू होणार असून ग्राहकांना केवायसी नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

रिझर्व्ह बँकेने पेटीएमचे मालक विजय शेखप झा यांना सामान्य हिंदुस्थानी नागरिक म्हणून केवायसी नियमांचे पालन करण्यास बजावले आहे. पेटीएम बँकेच्या नियमांनुसाक केवायसी नियमांचे संपूर्ण पालन करणा-यांचे वॉलेट पेमेंट बँकेत हस्तांतरीत होणार आहे. येत्या १५ जानेवारी पर्य़त पेटीएम वापरणा-या नागरिकांना केवायसी नियमांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

जर आपले वॉलेट १५ जानेवारी पर्य़त पेटीएन बँकेत हस्तांतरीत करावयाचे नसेल तर अशा ग्राहकांना पेटीएम कंपनीला ईमेल करून कळवावे लागेल. जर वॉलेटमध्ये रक्कम शिल्लक असेल तर ती घेण्यासाठीही कंपनीच्या ई-मेल आयडी [email protected] वर आपल्या बँक खात्याची माहिती कळवावी लागणार आहे. यामध्ये खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक आणि बँकेच्या आयएफएससी कोड बाबतची माहिती पेटीएम बँकेला द्यावी लागणार आहे.

नागरिक आपल्या वॉलेट मध्ये लॉग इन करून ही माहिती कळवू शकतात. त्यानंतर आपली शिल्लर रक्कम बँक खात्यात हस्तांतरीत केली जाईल. जर ग्राहकांनी माहिती दिली नाही तर वॉलेटमधील पैसे पेटीएम पेमेंट बँकेत हस्तांतरीत होतील. मात्र जोवर तुम्ही बँकेची माहिती देत नाही तोवर वॉलेटमधील पैसे वापरता येणार नाहीत. याशिवाय गेले सहा महिने वॉलेटचा वापर न करणारे, तसेच वॉलेटमध्ये झीरो बॅलन्स असेल तर त्यांचे वॉलेट पेमेंट बँकेत हस्तांतरीत होणार नाही. त्यामुळे लोकांनी पेटीएमला परवानगी देणे आवश्यक आहे.