औसा तालुक्यात पावसाअभावी ऊसाचे उत्पादन घटले

13

सामना ऑनलाईन । औसा

तालुक्यातील भादा परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र वाढले खरे पण पावसाअभावी उत्पादनात घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिली. याचा फटका परिसरातील शेतकर्‍यांना बसला आहे. या परिसरात सुमारे १६०० हेक्टर ऊसाचे क्षेत्र असून पावसाअभावी हे पीक वाळत असल्याचे दिसत आहे. विहीर, बोअर, साठवण तलाव कोरडे पडले आहेत. यामुळे ऊसाला पाणी मिळणे कठीण झाले आहे.

ऊस पिकाबरोबर सोयाबीन, तूर हे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे या पिकांचेसुद्धा उत्पादन घटणार असे वाटते. गेल्यावर्षी शिवाजी पवार यांचा ऊस २०-२५ कांड्यावर होत्या पण यंदा पावसाअभावी हा ऊस १० कांड्यावर आल्याने उत्पादन घटल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या