स्मार्टफोनमुळे ‘ती’ पडली पाण्यात

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आजकाल स्मार्टफोन ही प्रत्येकाचीच गरज झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोनचा वापर करत असतात. बऱ्याचदा स्मार्टफोनच्या नादात अनेक अपघातही झाल्याचेही समोर आले आहे. असाच एक हास्यास्पद प्रकार मॉलमध्ये एका महिलेसोबत घडला. ही महिला मॉलमध्ये खरेदीसाठी गेली होती. ती फोनमध्ये इतकी गुंग होती की, तिला मॉलमध्ये असलेला पाण्याचं कारंजंही दिसला नाही आणि ती फोनच्या नादात पाण्यात जाऊन पडली. काही दिवसांपूर्वी घडलेला हा सर्व प्रकार मॉलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

स्मार्टफोन ही काळाची गरज असली तरीही त्याच्या इतके आहारी जाणे योग्य नव्हे, असे काहीसे सांगणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्हालाही जर स्मार्टफोनचे व्यसन किंवा वेड असेल तर वेळीच तुमची ही सवय बदला नाहीतर तुम्हालाही अशाप्रकारे पश्चाताप होऊ शकतो.

पाहा व्हिडिओ –