लाखोंची कमाई करणारा भिकारी

सामना ऑनलाईन । मुंबई

महिन्याला लाखभर रुपये कमवणारा भिकारी चीनमध्ये आढळला आहे. या श्रीमंत भिकाऱ्याची मुले सर्वात महागड्य़ा शाळेत शिकत आहेत. जगभरात चर्चेला आलेल्या या व्यक्तीला प्रोफेशनल भिकारी असे समजले जात आहे. नोटांच्या ढिगाजवळ बसलेल्या या व्यक्तीची छायाचित्रे सोशल मीडियावर सध्या मोठ्य़ा प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

एवढे पैसे त्याच्याकडे कसे आले, याची कुणालाच माहिती नाही. तो केवळ भीक मागताना भिकाऱ्याच्या वेशात असतो. मात्र इतर वेळेला त्याची लाइफस्टाईल एकदमच वेगळी असते. बीजिंगमध्ये एका शानदार इमारतीत तो रहातो, असे त्याच्याबद्दल सांगितले जाते. त्याला तीन मुले आहेत. या अजब भिकाऱ्याला एकट्य़ाला नोटा मोजता येत नाहीत म्हणून तो कुणाची तरी मदत घेतो आणि मदत करणाऱ्या माणसाला पैसे द्यायला विसरत नाही.