‘एनडीए’ आली धावून, लालूंची ‘राजद’ गेली वाहून

84
lalu-yadav

सामना ऑनलाईन । पाटणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएने सगल दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवली आहे. यावेळी बिहारमध्ये भाजप-जदयू-लोक जनशक्ती असे पक्ष युतीत लढले आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (राजद)च्या नेतृत्वात लढणाऱ्या महागठबंधनला मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे राजदने 22 वर्षांत कधीही पाहिला नाही असा भीषण पराभव त्यांना यंदा पाहावा लागाला असून ते लोकसभेची एकही जागा जिंकू शकलेले नाहीत.

लालूप्रसाद यादव यांनी 1997 मध्ये राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली होती. त्यानंतर प्रत्येक लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगले यश मिळाले होते. 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांना 4 जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदा त्यांनी 19 जागा लढून देखील एकाही जागेवर यश मिळवता आले नाही.

यंदा बिहारमध्ये एनडीएने जोरदार कामगिरी केली. इथे 40 पैकी 39 जागा या एनडीएने जिंकल्या. किशनगंज येथील अवघी एक जागा काँग्रेसने जिंकली. एनडीएचे काम येथे खूप चांगले पाहायला मिळाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 171 सभा घेतल्या ज्यामध्ये 8 पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत होत्या. उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह 23 आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासोबत 22 सभा घेतल्या होत्या. याचा परिणाम युतीच्या उमेदवारांना भक्कम यश मिळण्यात झाला. तर दुसऱ्या बाजूला महागटबंधन हे सपेशल आपटल्याचे पाहायला मिळत होते.

आपली प्रतिक्रिया द्या