लालू प्रसाद यादव यांना मिळणार जेपी सेनानी पेन्शन

1

सामना ऑनलाईन । पाटणा
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना दरमहा १० हजार रुपये जयप्रकाश सेनानी सन्मान पेन्शन मिळणार आहे. बिहारच्या गृह मंत्रालयाने लालूंचा अर्ज स्विकारुन त्यांना जेपी सन्मान पेन्शन देण्याचे आज बुधवारी जाहिर केले आहे.

विद्यार्थी नेते व जेष्ठ समाजवादी जयप्रकाश नारायण यांनी १९७४ साली संपूर्ण क्रांतीचा नारा दिला होता. या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल मिसा कायद्याखाली लालूप्रसाद यांनी तुरुंगात धाडण्यात आले होते. बिहार सरकारने या क्रांतीमध्ये १ ते ५ महिने तुरुंगवास भोगणाऱ्यास दरमहा ५ हजार रुपये तर सहा महिन्यांहून अधिक तुरुंगवास भोगणाऱ्यास दरमहा १० हजार रुपये जेपी सेनानी पेन्शन देण्याची योजना आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी २००९ मध्य जेपी सेनानी पेन्शन योजना सुरु केली होती. नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांच्यासह ३१०० लोक या पेन्शनसाठी पात्र आहेत. मात्र नितीशकुमार हे या योजनेचे पेन्शन घेत नाहीत.