उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद नंतर लँड जिहाद

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

उत्तर प्रदेशमध्ये विश्व हिंदू परिषदने लव्ह जिहादच्या धर्तीवर लँड जिहाद सुरू केला आहे. याअंतर्गत विहिंप उत्तर प्रदेशमधील ठराविक धार्मिक स्थळे हटवणार आहे. धर्माच्या नावावर ठराविक समाज सरकारी जमिनीवर ताबा मिळवून तेथे देशविरोधी हालचाली करत आहे असा आरोप विहिंपने केला आहे. यामुळे अशा ठिकाणांची माहिती ती सरकारला पुरवण्याच काम लँड जिहादच्या अंतर्गत विहिंप करणार आहे.

याबद्दल विहिंपचे सह प्रांत संघटना मंत्री सुदर्शन चक्र महाराज यांनी सांगितले की हल्ली सरकारी जमिनी, पार्क,चौकात मजार बांधून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याआड महागड्या जमिनीवर कब्जा मिळवण्याचे उद्योग एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी सुरू केला आहे. अशा प्रकारची दोन प्रकरणं उत्तर प्रदेश मधील बिजनौर भागात समोर आली. यामुळे यापुढे अशी प्रकरणं सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम विहिंप करणार आहे. या अभियानामुळे लोकांच्या ताब्यात असलेली जमीन मुक्त होईल, असं महाराज यांनी म्हटलं आहे. विहिंपच्या या लँड जिहादचा प्रभाव मेरठमध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसतं आहे.

दरम्यान अशा घटनांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता जमीयत उलेमा हिंदचे कादरी आमीर आजम यांनी व्यक्त केली आहे.