पाहा श्रीदेवींचा हा अखेरचा व्हिडीओ

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडची पहिली स्त्री सुपरस्टार अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबई येथे निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

श्रीदेवी तिचे पती बोनी आणि मुलगी खुशी हिच्यासोबत दुबई येथील आपल्या नातेवाईकाच्या लग्नाला गेल्या होत्या. लग्न समारंभ आटपून बोनी आणि खुशी हिंदुस्थानात परतले. पण, श्रीदेवी मात्र तिथेच थांबल्या. हिंदुस्थानी प्रमाण वेळेनुसार रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान श्रीदेवींचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. दरम्यान, मृत्युपूर्वीचा त्यांचा लग्नसमारंभातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत श्रीदेवी यांचे अखेरचे क्षण कैद झाले आहेत.

पाहा श्रीदेवी यांचे अखेरचे काही क्षण-