डॉ. तात्याराव लहाने यांना पितृशोक

11

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने तसेच प्रथितयश डॉ. विठ्ठलराव लहाने यांचे वडील पुंडलिकराव लहाने (वय 95) यांचे वृद्धापकाळाने लातूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता लातूर जिह्यातील रेणापूर तालुक्यातील माकेगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या