नव्या सालात ज्ञानाचीही गुढी उंचवावी

2

सामना प्रतिनिधी । लातूर

आपल्या संस्कृतीमध्ये सणवार, मुहूर्त आदी बाबींची अंमलबजावणी जीवनामध्ये पाळण्याची परंपरा टिकवण्याचा प्रयत्न सर्वजण करतात. मग या उत्सवात ज्ञानाला का जपले जात नाही. ज्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा त्या महान संत, महात्मा, हुतात्मे यांच्या जयंती पुण्यतिथीच्या दिवशी सुट्टी का? या दिवशी तरी दिवसभर विचार का शिकवले जात नाहीत असे प्रश्न सतत सतावताना मार्ग काढण्याची भूमिका २६ महिन्यापासून सुट्टीविना चालू असलेल्या भाद्याच्या दोन्ही प्रशालेत साकारली जात आहे.

गुढीपाडव्यालाही नवे साल मानत असलो तर नव्या सालातही व्यायामास येणाऱ्या मुलांचा सत्कार पेन, पेन्सील देऊन व पटावर नसणाऱ्याही पण रोज योगासनाला येणाऱ्या चिमुकल्यांचाही सत्कार पेन, साखरेचा हार देऊन मुख्याध्यापक भारत सातपुते यांनी शाळेत ज्ञानाची गुढी उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर पुढच्या वर्षी दहावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा थोडावेळ जादा तासही घेतला. रात्री पुन्हा नियमित तासिका होतेच. या दिवसातला दुपारच्या वेळेत सातपुते लातूरला सणाला हजर राहतात. घरोघर नव्या सालातही ज्ञानाची गुढी उंचावण्याचे परिश्रम शाळांनी केले पाहिजेत. या गर्दीत, उत्सवात शिक्षणाला सुट्टी मिळणार नाही याची काळजी शिक्षण क्षेत्रांनी घ्यावी, असे मुख्याध्यापक सातपुते यांना वाटते.