मोटारसायकलच्या डिक्कीतून 1 लाख पळवले

सामना प्रतिनिधी । लातूर

मुलाच्या शिक्षणासाठी काढलेले 1 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलच्या डिक्कीमधून पळवल्याची घटना लातूरातील अंबाजोगाई रोडवर घडली. ज्यांचे पैसे पळवण्यात आले ते पोलीस दलातच कार्यरत आहेत.

या प्रकरणी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात जेजेराव आनंदराव पवार यांनी तक्रार दाखल केली. ते येथील गांधी चौक पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. 15 मार्च रोजी त्यांनी औसा रोडवरील अ‍ॅक्सीस बँकेतून मुलाच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये सोसायटीचे काढलेले होते. एलआयसी कार्यालयात बॉन्ड आणि कागदपत्रे घेण्यासाठी ते गेले होते. परत येऊन पाहिल्यानंतर त्यांची मोटारसायकल पंक्चर झालेली दिसून आले. मोटारसायकल क्रमांक एम.एच.38 एच 2584 ही पंक्चर काढण्यासाठी ढकलत दुपारी पावनेतीन वाजण्याच्या सुमारास गुलमनबी सायकल स्टोअर्स, जुना रेणापूर नाका येथे घेऊन गेले. त्यांच्याजवळील एक लाख रुपयांची पिशवी त्यांची मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवलेली होती. अज्ञात व्यक्तीने ही रक्कम पळवली. पिशवीमध्ये 1 लाख रुपयांसोबत बँकेचे पासबूक, एटीएम, चेकबुकही होते. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.