पेट्रोल पंपाचे दहन करून पेट्रोल दरवाढीचा निषेध


सामना प्रतिनिधी। लातूर

सततच्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवराष्ट्र सेवा संघाचे ॲड.निलेश करमुडी यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथे दयानंद गेट समोर प्रतिकात्मक पेट्रोल पंपाचे दहन करण्यात आले.

पेट्रोल डिझेलच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. एका वर्षात इधंनाचे दर दहा रुपया पेक्षा ही जास्त दराने वाढले आहेत. दरवाढीमुळे सामान्य जनतेचा खिसा रिकामा होत आहे . पेट्रोल डिझेलसाठी जी अतिरिक्त रक्कम मोजावी लागत आहे त्यापैकी निम्याहून अधिक रक्कम ही कराची आहे. संपूर्ण देशात पेट्रोल व डिझेलचे एकच भाव असले पाहिजेत व इंधनाचे वाढीव भाव त्वरित कमी करावेत या मागणीसह शिवराष्ट्र सेवा संघाच्या वतीने प्रतिकात्मक पेट्रोल पंपाचे दहन करुन आंदोलन करण्यात आले .

या आंदोलनात शिवराष्ट्र सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बप्पाराजे रोडके, उपाध्यक्ष विजय मुळे, शहराध्यक्ष अमरसिंह राजपुत, ईश्वर जाधव, सामाजिक कार्यकर्ते निपुन शेंडगे, आदींसह असंख्य कार्यकर्ते , पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.