लातूर जिल्ह्यात बंदला प्रतिसाद; मुरुडमध्ये एसटी बस जाळली

सामना प्रतिनिधी । लातूर

भिमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला लातूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. लातूर तालूक्यातील मुरुड येथे मध्यरात्री बसस्थानकात मुक्कामी असलेली एसटी.बस जाळण्यात आली. बाजारपेठ बंद असल्याकारणाने निलंगा येथे रस्त्यावरुन जाणारी अनेक दुचाकी वाहने फोडण्यात आली. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी द्यावी लागली. सर्वत्र बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेली होती, कडकडीत बंद पाळण्यात आला. औराद शहाजनी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला लातूर जिल्ह्यात सगळीकडे प्रतिसाद मिळाला. लातूर शहरातील शाळा, महाविद्यालये बंद होती. कांही शाळांनी तर थेट सुट्टीच दिलेली होती तर कांही शाळा सोडून देण्यात आल्या.

मुरूड येथे मुकामी असलेली धाराशिव डेपो ची एसटी बस आज्ञात व्यक्तीने एसटी ची मागील काच फोडून बस पेटवून दिली बस चे मागचे चार ते पाच सिट जळाली असून एसटी चे बसचालक,दिलीप आंधळे व कंडाक्टर,डी आर कोळी यांना विचारले आसता त्यानां सांगितले की आम्ही बसस्थानका रात्री झोपलेलो असताना ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने बस जाळली. मुरूडचे उपनिरीक्षक विश्वजित घोडके यांच्या सतर्कतेमुळे बसचे होणारे अधिकचे नुकसान टळले. मुक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

औराद शहा येथे सर्व दलित बांधवांकडून मुक मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला आणि स.पो.निरीक्षक रेजीतवाड, तहसिलदार निलंगा यांचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी शेळके यांना निवेदन देऊन मुक मोर्चा समाप्त करण्यात आल्याचे राहुल मोरे यांनी जाहीर केले. मोर्चामध्ये औराद परीसरातून शेळगी, तगरखेडा, ताडमुगळी येथून बरेचसे भिमबांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते या सर्व जमलेले भिम बांधवांचे रवींद्र गायकवाड यांनी आभार मानले. औरादमधील सर्वच व्यापारी यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोदविला.या मोर्चामध्ये जवळपास ५०० भिमबांधव उपस्थित होते.त्यांचे प्रमुख नेत्रत्व हे जीवन कांबळे, महेंद्र कांबळे, लक्ष्मण कांबळे, माधव कांबळे, रवींद्र गायकवाड, दत्ता गायकवाड यांनी केले.

निलंगा येथे बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आलेली होती. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी वाहनांना लक्ष करीत अनेक दुचाकी वाहने फोडण्यात आली आहेत. देवणी तालूक्यातील वलांडी येथेही कडकडीत बंद पाळण्यात आल. चाकूर शहरासह तालूक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. औसा तालूक्यातही बंदचा प्रतिसाद मिळाला. उदगीर शहरासह तालूक्यातील गावांमधून कडकडीत बंद पाळण्यात आला. वाढवणा येथे बंदला प्रतिसाद मिळाला.