शिवसेनेला जिंतूर, घनसावंगी, परतूर, गंगाखेडात मताधिक्य, परभणी आणि पाथरीत राष्ट्रवादीला लिड

450

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाची आकडेवारी पाहिली असता शिवसेनेला जिंतूर, घनसावंगी, परतूर आणि गंगाखेड विधानसभा मतदार संघात प्रचंड मताधिक्य मिळाले. तर परभणी आणि पाथरी या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला चांगलेच मताधिक्य मिळाले आहे. शिवसेनेला मताधिक्य मिळविण्यात अडचण निर्माण झाली.

गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये केवळ परभणी विधानसभा मतदार संघात शिवसेनेला कमी मतदान झाल्याची बाब समोर आली होती. इतर पाचही विधानसभा मतदार संघात मोठे मताधिक्य प्राप्त झाल्याने शिवसेना खासदार संजय जाधव यांचा १ लाख २७ हजाराच्या फरकाने शिवसेनेचा विजय झाला होता.

जिंतूर विधानसभा मतदार संघात शिवसेनेला चांगले मताधिक्य मिळाले आहे. जिंतूरात शिवसेनेला १ लाख ३ हजार २४७ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ७९ हजार २९० मते मिळाली. शिवसेनेला २३ हजार ९५७ ची आघाडी मिळाली.

गंगाखेड विधानसभा मतदार संघात शिवसेनेला १ लाख १३ हजार २०५ मते मिळाली तर राष्ट्रवादीला ८४ हजार ७३० मते मिळाली. या ठिकाणी शिवसेनेला २८ हजार ४७५ मताधिक्य मिळाले.

परतूर मध्ये शिवसेनेला ७९ हजार ६३६ मते मिळाली. तर राष्ट्रवादीला ६० हजार ९१४ मते मिळाली. या मतदार संघात शिवसेनेला १८ हजार ७२२ मताधिक्य मिळाले.

घनसावंगी विधानसभा मतदार संघात शिवसेनेला ९० हजार ३९५ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ६६ हजार १०३ मते मिळाली. शिवसेनेला २४ हजार २९२ मतांचे मताधिक्य मिळाले.

परभणी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला ९६ हजार ३५४ मते मिळाली. या ठिकाणी शिवसेनेला ६६ हजार १३७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला ३० हजार २१७ मतांचे मताधिक्य मिळाले.

अशीच परिस्थिती पाथरी विधानसभा मतदार संघात पहावयास मिळाली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला १ लाख ८ हजार ९८१ मते मिळाली. तर शिवसेनेला ८३ हजार ५९४ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसला २५ हजार ३८७ मतांचे मताधिक्य मिळाले.

परभणी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला ९६ हजार ३५४ तर शिवसेनेला ६६ हजार १३७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला ३० हजार २१७ मतांचे मताधिक्य मिळाले. यावरुन परभणी आणि पाथरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसेला ५५ हजार ६०४ मताधिक्य मिळाले आहे. दोघांचा फरक काढल्यास ३९ हजार ८४२ मताधिक्य शिवसेनेला मिळाले. यात पोस्टल मतदान समाविष्ठ केल्यानंतर ४२ हजार १९९ इतक्या मतांनी शिवसेनेचा विजय झाला.

या निवडणुकीत पोस्टल मतदान ७२७ सह संजय जाधव यांना एकूण ५ लाख ३८ हजार ९४१ मते मिळाली. तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राजेश विटेकर यांना पोस्टल ३७० मतांसह एकूण ४ लाख ९६ हजार ७४२ मते मिळाली. गेल्या ३० वर्षापासून परभणी जिल्ह्यावर वर्चस्व असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा आपला गढ कायम राखला आहे. अतिशय अटीतटीच्या झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेना-भाजपा युतीचे संजय जाधव यांनी दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली आहे. या निवेडणूकीमध्ये त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आलमगिर खान यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून संजय जाधव यांनी आघाडी घेतली होती. ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली होती.

आपली प्रतिक्रिया द्या