चंद्रपूरमध्ये बिबट्याने घेतला तिसरा बळी, लोकांमध्ये दहशत

55
leopard

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही या तालुक्याच्या गावापासून अवघ्या 5 किमीवर असलेल्या मुरमाडी येथे बिबट्याने तिसरा बळी घेतला. रविवारी सायंकाळच्या सुमारास गुरे चराई करून जंगलातून परतणाऱ्या तुळशीराम पेंदाम (65) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि दूरवर फरफटत नेऊन मारले. या आठ दिवसातील ही तीसरी घटना आहे.

यापूर्वी याच तालुक्यात गडबोरी इथे दोन जणांचा बळी बिबट्याने घेतला. मुरमाडी येथील घटनेनंतर लोकांमध्ये रोष आहे. जोपर्यंत पालकमंत्री घटनास्थळाला भेट देत नाही, थेट कारवाईचे आदेश देत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका लोकांनी घेतली आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या