‘दंगल गर्ल्स’ करणार मतदान करण्याचे आवाहन

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

कुस्तीचे मैदान गाजवल्यानंतर ‘दंगल गर्ल्स’ गीता व बबिता फोगट आता निवडणूक प्रचारात उतरणार आहेत. कानपूरमध्ये निवडणूक आयोगाच्या मोहीमेंतर्गत या गीता आणि बबिता या दोघी फोगट बहिणी जनतेला मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत.

कानपूर आणि आसपासच्या खेडेगावांमध्ये जाऊन गीता आणि बबिता ग्रामस्थांना मतदानाचे महत्व सांगणार आहेत. तसेच पहलवानांच्या वस्त्यांमध्येही दंगल सिनेमाचे खास खेळ दाखवून त्यांना मतदान करण्याचे आवाहन फोगट भगिनी करणार आहेत.