सरकार कसे चालवायचे हे न्यायालयाने शिकवू नये! – रविशंकर प्रसाद

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सरकार कसे चालवायचे हे काम जनतेने निवडलेल्या लोकांवर सोडून द्यावे, असे आवाहन न्यायाधीशांना केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज केले. सरकार कसे चालवायचे हे न्यायालयांनी शिकवू नये, असे त्यांनी सूचित केले.

कोणताही कायदा घटनाबाह्य असे मानून तो न्यायालय रद्द करीत असेल तर जनतेने निवडलेल्या लोकांवर सरकार आणि कायदा बनविण्याची जबाबदारी सोपवली पाहिजे, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगातर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त सरन्यायाधीश एच. एल. दत्तू हेही उपस्थित होते.