5 दिवसांत बिबट्याने दोघांचा जीव घेतला, गडबोरीवासी दहशतीखाली

91

सामना ऑनलाईन,चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या गडबोरीमध्ये एका महिलेला बिबट्याने ठार मारले आहे. गयाबाई पैकू हटकर (65 वर्ष) असं या महिलेचे नाव आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या वृद्धेला बिबट्याने घरातून फरफटत नेत ठार मारले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गयाबाई झोपलेल्या असताना बिबट्या त्यांच्या झोपडीत शिरला. बिबट्याने खाटेवर झोपलेल्या गयाबाईंना फरफटत नेलं. प्रतिकाराची अंगात ताकद नसल्याने गयाबाई बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव वाचवू शकल्या नाहीत. याच महिन्यामध्ये 2 तारखेला याच गावात बिबट्याने 9 महिन्यांच्या राकेश गुरनुले या बाळाला उचलून नेत ठार मारलं होतं.  या घटनेनंतर एका बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आलं होतं. मात्र तरीही पुन्हा बिबट्याने हल्ला केला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गडबोरीच्या जंगलात तीन ते चार बिबटे आहेत आणि ते सगळे जण इथल्या मानवी वस्तीसाठी धोकादायक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या