सोमेश्वरात फासकीत अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

19

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील शेलारवाडीत बिबट्या फासकीत अडकला. फासकीत अडकलेल्या बिबट्याला रविवारी सकाळी वनविभागाने फासकीतून काढून पिंजऱ्यात बंद केले. शेलारवाडी येथील बांधावर लावण्यात आलेल्या फासकीत शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या फसला. एका ग्रामस्थांनी बिबट्या फासकीत अडकल्याचे वनविभागाला कळवले. वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्रीची वेळ असल्याने आणि बांधापर्यंत पोहचण्यास रस्ता नसल्याने बिबट्याला पकडता आले नाही. त्यामुळे रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून बिबट्याला फासकीतून बाहेर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. सकाळी आठ वाजता बिबट्याला फासकीतून बाहेर काढण्यात यश आले.

आपली प्रतिक्रिया द्या