भाजपविरोधातील लढाई ‘वन टू वन’ होऊ द्या!


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुढील वर्षी होणाऱया लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात ‘वन टू वन लढाई’ होऊ द्या. जिथे जो पक्ष मजबूत असेल त्याला भाजपचा पाडाव करून जिंकण्याची संधी द्या, असे आवाहन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटून केले.

भाजपला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या आघाडीला काँग्रेसने मदत करावी अशी विनंती आपण सोनियांना केल्याचे ममतांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. ममता बॅनर्जी यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजप नेते अरुण शौरी, खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याही भेटी घेतल्या.