ढिंच्यॅक पूजाला इतर स्पर्धक टरकले, का ते वाचा…

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉसच्या घरात दिवसेंदिवस प्रचंड वाद होत आहेत. घरातील स्पर्धेक एकमेकांवर आगपाखड करत असतात, एकमेकांना मारहाण करत असतात,शिव्या देत असतात. या सगळ्या प्रकारांमुळे स्पर्धकांना बिग बॉसची देखील भीती वाटेनाशी झाली आहे. ढिंच्यॅक पूजाने जेव्हापासून बिगबॉसच्या घरात पाऊल ठेवलं आहे तेव्हापासून सगळेजण तिला टरकून आहेत, कोणीही तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत नाहीये. खासकरून महिला स्पर्धक तिच्या वाऱ्यालाही उभ्या राहत नाहीये. असं काय केलंय या पूजाने की तिला घाबरलेत असा अनेकांना प्रश्न पडला आहे. याचं उत्तर आहे की ही मंडळी पूजाला नाही तर तिच्या डोक्यातील उवांना घाबरली आहेत.

सोमवारी कॉमनर स्पर्धक ज्योती कुमारी आणि अभिनेता हितेन तेजवानीने ढिंच्यॅक पूजाच्या डोक्यात उवा असल्याचे बघितले. त्यानंतर इतर स्पर्धकांना त्यांनी याविषयी सांगितले. ढिंच्यॅक पूजा घरात आल्यापासून ड्रामेबाज अर्शी खान तिच्या बाजूला झोपतेय. पूजाच्या डोक्यात उवा असल्याचे अर्शीला समजताच तिने पुन्हा घरात गोंधळ घातला. उवांमुळे घाबरलेल्या स्पर्धकांनी बिग बॉसकडे पूजासाठी उवांचे औषध मागितले. बिग बॉसने देखील पूजासाठी उवांचे औषध दिले. त्यानंतर शिल्पाने पूजाची समजूत काढत तिला ते औषध वापरण्यास सांगितले. रविवारच्या विकेंड का वार या स्पेशल भागात ढिंच्याक पूजाने वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.