मेस्सी, ऍग्युरो यांचा अर्जेंटिनाच्या संघात समावेश

36

सामना ऑनलाईन । ब्यूनस आयर्स

लिओनेल स्कालोनी यांच्या मार्गदर्शनाखालील अर्जेंटिना संघात आगामी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेसाठी बार्सिलोनाचा आघाडीवीर लिओनेस मेस्सी आणि सर्जियो ऍग्युरो यांचा समावेश करण्यात आला आहे.

पॅरिस सेंट-जर्मेनचा अव्वल खेळाडू अँजेल डी मारिया याचाही 23 जणांच्या संघात समावेश करण्यात आला असला तरी आघाडीवीर गोन्झालो हिग्यूएनला स्थान मिळू शकले नाही. ‘राष्ट्रीय संघासाठीही स्पर्धा खूपच महत्त्वाची असल्यामुळे सर्वोत्तम खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकाला समाधान देणे फारच कठीण आहे,’ असे स्कालोनी यांनी सांगितले. 14 जूनपासून ब्राझील येथे सुरू होणाऱ्या कोपा अमेरिका स्पर्धेत अर्डेंटिनाच्या ‘ब’ गटात कोलंबिया, पॅराग्वे आणि पाहुण्या कतार (2022 विश्वचषकाचे आयोजक) या संघांचा समावेश करण्यात आला आहे. मेस्सीने आठ महिन्यांच्या कालावधीनंतर अर्जेंटिना संघात पुनरागमन केले आहे. तर इंटर मिलानचा आघाडीवीर मौरो इकार्डीला संघातून वगळण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या