शिकाऱ्याचीच शिकार केली, सिंहानी धड खाल्लं मुंडकं सोडून दिलं

सामना ऑनलाईन, जोहान्सबर्ग

दक्षिण अफ्रिकेतील क्रूझर राष्ट्रीय उद्यानामध्ये एका व्यक्तीचं फक्त मुंडकं आढळल्यानं खळबळ उडाली होती. या व्यक्तीचं मुंडकं सोडून बाकी सगळं शरीर सिंहांनी खाऊन टाकल्याचं स्पष्ट झालंय. शरीराचे काही अवशेष या उद्यानातील गेम पार्कमध्ये मिळाले आहेत. लिम्पोपो भागातील पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सिंहांनी खाऊन टाकलेली व्यक्ती ही त्यांची शिकार करण्यासाठी आली होती असा अंदाज वर्तवला आहे.

पोलीस अधिकारी मोत्शे एनगोपे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की ज्या व्यक्तीला सिंहांनी खाल्लंय ती व्यक्ती गेम पार्कमधअये या सिंहांची शिकार करायला आली होती. शिकार करतेवेळी या सिंहांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीचा डोक्याचा भाग आणि शरीराचे फार थोडे अवशेष शिल्ल क राहीले आहेत.