Terror attack list उरीनंतर जम्मू-कश्मीरमध्ये झालेले सर्वात मोठे हल्ले…

3
jammu-kashmir-attack

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

2016 मध्ये उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. परंतु यानंतरही सातत्याने कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून रक्तपात सुरुच राहिला. नुकताच पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. यात 30 जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती मिलत आहे. उरी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या काही मोठ्या दहशतवादी हल्ल्यांवर नजर टाकू…

14 जानेवारी, 2019 –
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाल्याची माहिती.

7 फेब्रुवारी, 2018 –
जम्मू-कश्मीरच्या अखनूरमध्ये स्फोटात हिंदुस्थानी लष्कराचे तीन जवान शहीद, 6 स्थानिक लोक जखमी.

9 जानेवारी 2017 –
जम्मू-कश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये जीआरईएपच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला. या हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला.

12 फेब्रुवारी 2017 –
कुलगाम जिल्ह्यातील नागबल येथे दहशतवादी हल्ल्यात 2 जवान शहीद, 2 स्थानिक नागरिकांचा मृत्यू. चार दहशतवाद्यांचा खात्मा.

14 फेब्रुवारी 2017 –
बांदिपुरा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवानांचा मृत्यू, एका दहशतवाद्याचा खात्म, कुलवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे एका जवानाचा मृत्यू, तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा.

23 फेब्रुवारी 2017 –
कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील मुलू चित्रगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद.

16 जून 2017 –
अनंतनाग जिल्ह्यातील अचबल येथे पोलीस दलावर दहशतवादी हल्ल्यात सहा पोलीस शहीद.

10 जुलै, 2017 –
अमरनाथला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर जम्मू-श्रीनगर महामार्गावर दहशतवादी हल्ला. पाच महिलांसह सात भाविकांचा मृत्यू.

27 ऑगस्ट, 2017
पुलवामा जिल्ह्यातील जिल्हा पोलीस लायन्समध्ये घुसून दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार. आठ पोलीस शहीद. जैश-ए-मोहम्मदने घेतली होती जबाबदारी.

1 सप्टेंबर, 2017 –
जम्मू-कश्मीर पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला. तीन पोलीस शहीद.

27 सप्टेंबर, 2017 –
सुट्टीसाठी घरा जाणाऱ्या बीएसएफ कॉन्स्टेबल रमीज पर्रेय याचे अपहरण करून दहशतवाद्यांनी केली हत्या.

डिसेंबर 2018 –
पुलवामध्ये सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रावर आत्मघातकी हल्ला, पाच जवान शहीद

जून 2016 –
पुलवामामध्ये सीआरपीएफच्या पथकावर हल्ला, आठ जवान शहीद, 28 जखमी.
बिजबेहडा येथे सीआरपीएफच्या पथकावर हल्ला, तीन जवान शहीद.

मे, 2016 –
श्रीनगरमध्ये दोन ठिकाणी पोलिसांवर दहशतवादी हल्ला. तीन पोलीस शहीद.

जानेवारी 2016 –
पठानकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ल्यात सात जवान शहीद, 20 जखमी