Live: गणपती चालले गावाला… बाप्पाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

सामना ऑनलाईन । मुंबई

अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सारे सज्ज झाले आहेत. मुंबईसह राज्यात घरगुती गणपतीचं विसर्जन सुरू झालं आहे. यासोबतच सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या सगळ्याचे फोटो, व्हिडिओ लाईव्ह अपडेट आपल्याला येथे पाहायला मिळतील…

लाईव्ह अपडेट:

 • मुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत १५४० सार्वजनिक आणि २० हजार ७०५ घरगुती गणपतींचे विसर्जन; १५४ गौरींचेही विसर्जन
 • मुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत कृत्रिम तलावात ६० सार्वजनिक, २१४३ घरगुती गणपती आणि १५ गौरींचे विसर्जन

nashik-new-pic nashik-pic

नाशिकचे गणपती विसर्जन

 • मुंबईत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ३३० सार्वजनिक तर ९,०२५ घरगुती गणपतींचे विसर्जन
 • केशवजी चाळ गणपती पालखीतून लेझीमच्या तालावर चौपाटीच्या दिशेने निघाला
 • भांडुपमध्ये गणेश मिरवणुकीत वाद, डीजे बंद करायला लावल्याने मिरवणुका थांबल्या
 • रंगारी बदक चाळचा गणपती गिरगाव चौपाटीवर
 • तेजूकाया, खेतवाडीतील गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर
 • गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी
 • महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप
 • पुण्यात मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन
 • अंबरनाथ येथील विसर्जनाची मिरवणूक

1

 • पुणेः मानाचा तिसरा गणपती ‘गुरुजी तालीम’चे  अलका चौकात आगमन
 • पुणेः मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचे विसर्जन
 • कोल्हापूरची विसर्जन मिरवणूकः दुपारी ३ पर्यंत २८० मूर्तींचे विसर्जन

cm

 • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचे कृत्रिम तलावात विसर्जन
 • आज (मंगळवारी) रात्री ११.४५ वाजता भरती, लाटांची उंची ३.८६ मीटर असेल
 • मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत कृत्रिम तलावात १० सार्वजनिक गणपती, ३४० घरगुती बाप्पा आणि १५ गौरी यांचे विसर्जन
 • मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत ८० सार्वजनिक गणपती, ३६०७ घरगुती बाप्पा, ३० गौरी यांचे विसर्जन
 • सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त
 • नवी मुंबई येथे विसर्जन मिरवणूक सुरू
 • नाशिकमध्ये विसर्जन मिरवणूक सुरू
 • पुण्यात मानाचा पहिला गणपती अर्थात कसबा पेठ गणपतीचे नटेश्वर हौद येथे विसर्जन

लातूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस सुरुवात (फोटो: श्याम भट्टड)

लातूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस सुरुवात (फोटो: श्याम भट्टड)
लातूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस सुरुवात (फोटो: श्याम भट्टड)

 

जळगाव येथे भिलपुरा चौकात मुस्लिम बांधवांनी विर्सजन मिरवणुकीवर केली पुष्पवृष्टी… (फोटो: भरत काळे)

जळगाव येथे भिलपुरा चौकात मुस्लिम बांधवांनी विर्सजन मिरवणुकीवर केली पुष्पवृष्टी... (फोेटो: भरत काळे)
जळगाव येथे भिलपुरा चौकात मुस्लिम बांधवांनी विर्सजन मिरवणुकीवर केली पुष्पवृष्टी… (फोेटो: भरत काळे)

 

गुरुजी तालिम मंडळ: पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक (फोटो: राजू हिंगे)

गुरुजी तालिम मंडळ: पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक (फोटो: राजू हिंगे)
गुरुजी तालिम मंडळ: पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक (फोटो: राजू हिंगे)

वडाळ्याच्या ‘जीएसबी’ मंडळाचा सामाजिक वसा

येथे क्लिक करा: बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज!

पुण्यातील कसबा गणपतीची मिरवणूक…

पुण्यातील मानाचा कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक (फोटो: राजू हिंगे, पुणे)
पुण्यातील मानाचा कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक (फोटो: राजू हिंगे, पुणे)

 

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक…

 • पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

विसर्जन विशेषः मुंबईतील वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल

गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत,पालिकेचे कर्मचारी गणपती विसर्जन कराताना

‘लालबागचा राजा’ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार

 • नगर – मनाचा गणपती ग्रामदैवत श्री विशाल गणपती उत्थापन पूजा जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते सुरू

nagar-manacha-ganpati

 • कोल्हापूरमध्ये मानाचा पहिला गणपती तुकाराम माळी मंडळ विसर्जन मिरवणूक सुरू
 • मुंबईच्या राज्याच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी
 • मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या गणपतीच्या मिरवणुकीला मोठ्या थाटामाटात सुरुवात
 • कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन सज्ज
 • विसर्जन मार्गावर ड्रोन कॅमेऱ्याच्या सहय्याने ठेवणार नजर
 • जागोजागी पोलिसांच्या तुकड्या तैनात
 • बाप्पांच्या विसर्जन मार्गावर कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा सज्ज
 • गणेश विसर्जनासाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण