दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताचे सरकार येणार – मोदी

68

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे –

 • संरक्षणमंत्र्यांनी सर्व आरोपांना संसदेत उत्तरे दिली आहेत – शहा
 • राहुल गांधींकडे काही पुरावा असेल तर न्यायालयात सादर करायचे होते, राजकीय आरोप करून काही साध्य होणार नाही – शहा
 • हिंदू दहशतवाद हा काँग्रेसचा अजेंडा – शहा
 • व्होटबँकेसाठी हिंदू दहशतवादाचे षडयंत्र रचले, शहा यांचा काँग्रेसवर निशाणा
 • आमच्या विचारांना साथ देणाऱ्या पक्षाचे एनडीएत स्वागत आहे – शहा
 • वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी नेत्यांवर काय कारवाई करायची याचा निर्णय पक्षाची समिती घेईल – शहा
 • ममतादीदींना प्रसारमाध्यमांनी हिंसाचाराचा जाब विचारायला हवा – शहा
 • गेल्या दीड वर्षात पश्चिम बंगालमध्ये आमच्या 80 कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या – शहा
 • विरोधकांच्या चुकीच्या प्रचारामुळे आमचाच फायदा झाला – शहा
 • आम्ही शासन आणि प्रशासनाची नवी संस्कृती आणली – मोदी
 • मला खात्री आहे पूर्ण बहुमताचे सरकार बनणार – मोदी
 • देशातील प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे – मोदी
 • परंतु आता निवडणुका, आयपीएल, परीक्षा सर्व एकत्र होत आहे, सरकार भक्कम हवे – मोदी
 • 2009 आणि 2014 चे आयपीएल देशाबाहेर  झाले – मोदी
 • पाच वर्षात सरकारने भरीव काम केले – मोदी
 • पहिली संधी 2014 ला मिळाली आता 2019 ला मिळणार – मोदी
 • जगाला प्रभावित करणाऱ्या गोष्टी हिंदुस्थानात – मोदी
 • 17, 2014 ला आम्ही इमानदारीने कामाला सुरुवात केली – मोदी
 • 17 मे, 2014 ला सट्टेबाजांचे नुकसान झाले – मोदी
 • जगातील सर्वात मोठी लोकशाही – मोदी
 • महागाई आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा नसलेली पहिली निवडणूक – शहा
 • पाच वर्षामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ झाली – शहा
 • आज आमची 16 राज्यांमध्ये सरकारे आहेत – शहा
 • सत्तेत आल्यापासून 133 योजना लागू केल्या – शहा
 • 2019 ला 2014 पेक्षा मोठा विजय मिळेल – शहा
 • ‘नरेंद्र मोदी प्रयोग’ देशाने स्वीकारला – शहा
 • शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवल्या – शहा
आपली प्रतिक्रिया द्या