Lok sabha 2019 अखेर पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर, मावळमधून लढणार

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज लोकसभा निवडणुकांसाठी म्हणून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पार्थ पवार यांच्यासह 5 जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मावळमधून पार्थ अजित पवार, शिरूर येथून डॉ.अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, दिंडोरीमधून धनराज महाले, बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.