Live: बंद मागे घेताना हिंसाचाराशिवाय तो यशस्वी झाल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्रात उमटत आहेत. मात्र हे आंदोलन शांततेतच व्हायला हवे, असे सांगून डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या निषेधार्थ आज, बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. त्यांच्या आवाहनानंतरही राज्याच्या अनेक भागात तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. मुंबईमध्ये लोकलची वाहतूक, रस्ते वाहतूक आणि मेट्रोची वाहतूक रोखून धरण्यात आली.

Live: महाराष्ट्र बंद संदर्भातील ताजे अपडेट

 • हिंसाचार होणार नाही असं मी आश्वासन दिलं होतं, आणि आम्ही ते पाळलं- प्रकाश आंबेडकर
 • जर दंगल झाली असती तर मी ही नावे जाहीर केली असती
 • बंदला गालबोट कोण लावू शकतं त्यांची नावे प्रशासनाला दिली होती
 • बंदला हिंसक वळण लागल्याचं मान्य नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे
 • राज्यातील ५० टक्के आंदोलनात सहभागी झाली असे मी मानतो
 • बंद मागे घेत असल्याची प्रकाश आंबेडकरांची घोषणा

 • चेंबूर सिद्धार्थ काॅलनी येथे रास्ता रोको
 • आंदोलनाच्या नावाखाली तरूणांची गुंडगिरी, दगडफेक आणि शिवीगाळ करत प्रवाशांना ट्रेनमधून जबरदस्तीने उतरवले
 • आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत ४८ बेस्ट बसेसचे नुकसान
 • मानखुर्द स्थानकाजवळ आंदोलकांचा रेल रोको सुरूच
 • डोंबिवली,अमरावतीमध्ये कडकडीत बंद
 • परभणीत राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालयात जाळपोळ करण्यात आली
 • पाच वाजता आंदोलन मागे घेणार असल्याची रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकरांची माहिती
 • मेट्रोची वाहतूकही अजून ठप्प आहे
 • ईस्टर्स एक्सप्रेस हायवे वरील वाहतूक अजूनही ठप्प, चार तासांपासून आंदोलकांनी वाहतूक रोखून धरली आहे.
 • पवई,विक्रोळी,घाटकोपर इथे गाड्यांची मोडतोड केली
 • बसायचे बाक, पिण्याच्या पाण्याची काऊंटर्स, ट्युबलाईट तोडून टाकल्या
 • कांजुरमार्ग स्थानकात जबरदस्त तोडफोड
 • विक्रोळी पार्कसाईटमध्ये वाहनांची तोडफोड
 • कल्याणच्या पत्रीपूल परिसरात रास्तारोको
 • लातूर जिल्ह्यात बंदला प्रतिसाद; मुरुडमध्ये एसटी बस जाळली
 • डोंबिवली स्थानकात तिकीट घर फोडलं
 • मुरुड येथे मध्यरात्री बस जाळली खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण एस.टी.वाहतूक बंद
 • लातूर जिल्ह्यात बंदला प्रतिसाद
 • डोंबिवली रेल्वे स्थानकात जोरदार रेलरोको
 • दिल्लीत महाराष्ट्र सदन येथील बंदोबस्त वाढवला
 • दहिसर स्थानकावर रेल रोको
 • वरळी नाका ऐवजी वरळी सीफेसचा मार्ग वाहतुकीसाठी वापरा, पोलिसांची विनंती
 • वरळी नाका, सकाळी ११  ते १२ तब्बल तासभर रास्तारोको
 • दादर रेल्वे स्थानकात जोरदार आंदोलन, मध्य आणि पश्चिम मार्गावरची रेल्वे रोखली
 • कळवा नाका परिसरात ३० मिनिटांपासून रास्तारोको, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
 • लोकसभेत खासदारांची जबरदस्त घोषणाबाजी, लोकसभेचं कामकाज १२.४५ पर्यंत तहकूब
 • ३ वर्षात एकदाही दंगे झाले नाहीत, महाराष्ट्र  विकासाच्या मार्गाने जातोय ज्यांना विकास नकोय त्यांनी हे दंगे घडवून आणायचे प्रयत्न केलेत. या घटनेच्या चौकशीचे महाराष्ट्र सरकारने चौकशीचे आदेश दिलेत- रावसाहेब दानवे
 • राजकारणासाठी काही लोकांनी दोन जातींमध्ये तणाव वाढवण्यासाठी हा प्रयत्न केलाय. मराठा-दलित यांच्या भांडणं लावण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय- शिवाजीराव आढळराव पाटील
 • पंतप्रधान मोदी या घटनांवर गप्प का? खरगे यांचा लोकसभेत प्रश्न
 • मल्लिकार्जुन खरगे यांनी शून्य प्रहरात बोलताना सरकारवर आरोप केले, लोकसभा अध्यक्षा महाजन यांनी खरगे यांना रोखले
 • भीमा कोरेगाव प्रकरणावरून लोकसभेत चर्चा
 • भीमा कोरेगाव प्रकरणावरून राज्यसभेत गोंधळ, दोन वेळा कामकाज तहकूब
 • गोवंडी, जुईनगर इथे आंदोलनकर्त्यांनी लोकल अडवून धरण्याचा प्रयत्न केला
 • हार्बर मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली
 • घाटकोपर इथे आंदोलक ट्रॅकमध्ये उतरल्याने मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली
 • दादर पूर्वेला बाबासाहेब आंबेडकर मार्गावरही दलित संघटनांचे आंदोलन, आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली
 • आंदोलनाचा यवतमाळमधील एसटी सेवेला फटका, एसटी सेवा बंद झाल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल
 • नागपुरात शताब्दी चौकात दलित संघटनांची निदर्शने
 • गुहागर तालुक्यातील मधील एसटी सेवा पूर्णपणे बंद
 • घाटकोपरमधील आंदोलनामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली
 • घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरजवळ आंदोलनकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं
 • असल्फा आणि घाटकोपर दरम्यान मेट्रोही अडवण्यात आली
 • बोरिवलीत दलित संघटनांच्या आंदोलनामुळे मागाठाणे इथे वाहतूक ठप्प
 • बोरिवली पूर्वेला मागाठाणे बस डेपोजवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची दोन्ही बाजूची वाहतूक बंद
 • कल्याणमध्ये सूचकनाका परिसरात किरकोळ दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण
 • नांदेडमध्ये आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळल्याने, रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती
 • पवईजवळ अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली
 • मिलिंद एकबोटे यांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी दांडेकर पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी
 • जो न्याय याकूब मेमनला लावला तोच एकबोटे आणि भिडे गुरुजींना लावा-प्रकाश आंबेडकर
 • पुण्यातील पानमळा भागात दलित संघटनांचा मोर्चा
 • पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळापर्यंत मोर्चाचे आयोजन
 • पानमळा भागात पीएमपीएल बसवर दगडफेक
 • हडपसर येथीस गांधी चौकात निदर्शने सुरू आहेत.
 • मुंबईतील धारावीमध्ये बहुतांश दुकाने बंद
 • संभाजीनगरमध्ये एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद
 • नगरमधील ११ डेपोतून एसटीची वाहतूक बंद
 • वासिंद येथे १०० टक्के बंद पाळण्यात आला असून आंदोलकांनी मुंबई-नाशिक महामार्ग १० मिनिटे रोखून निषेध व्यक्त केला.
 • मुलुंड परिसरातील बहुतांश दुकाने सगल दुसऱ्या दिवशीही बंद
 • जामखेड, पाथर्डी,श्रीगोंद्यात एसटीची वाहतूक ठप्प
 • नालासोपारा इथे सकाळी दहाच्या सुरामास लोकल वाहतूक अडवण्याचा दलित संघटनांचा प्रयत्न
 • शालेय बस व विद्यार्थ्यांना घेऊन येणारी खाजगी वाहने संपात उतरल्याने हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील इतर शाळांमध्ये खबरदारीचा सुरक्षित उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शिक्षक वर्गांना अर्ध दिवसाची सुट्टी जाहीर केली.
 • विरार पाठोपाठ गोरेगांव इथे लोकल गाडी अडवत आंदोलन करण्यात आलं, मात्र सध्या वाहतूक सुरळीत सुरू
 • कांदिवली-आकुर्ली, दिंडोशी-हनुमान नगर, चांदिवली-संघर्षनगर, साकीनाका-खैरानी रोड, सहार कार्गो, मुलुंड चेकनाका, जिजामाता नगर या मार्गावर बेस्ट बस धावत नसल्याची प्रशासनाची माहिती
 • मुंबईत तीनही मार्गांवरील लोकल वाहतूक सुरू
 • संभाजीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद
 • संभाजीनगर इथे देवगिरी शाळेच्या सहलीच्या बसवर दगडफेक करण्यात आली
 • संभाजीनगर, अमरावती, अकोल्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत
 • ठाण्यात बहुतांश खाजगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे
 • सोलापुरात अकोलेकाटी इथे बसवर दगडफेक
 • भीमा कोरेगाव प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज संसदेत माहिती देण्याची शक्यता
 • दादरमधील फुल बाजारात व्यवहार सुरू
 • दादरमध्ये परिस्थिती अगदी सुरळीत, सर्व व्यवहार चोख सुरू, बंदचा कुठलाही परिणाम नाही
 • मुलुंड चेकनाका परिसरात आंदोलकांनी बेस्ट बसची हवा सोडली, लोकांना बसमधून उतरवलं
 • अहमदनगरला जिल्ह्यातील अकरा एसटी आगाराची वाहतूक बंद, श्रीरामपूर, जामखेड, पाथर्डी, तारकपूर, श्रीगोंदासह सर्व आगारातील एसटी वाहतूक ठप्प -विभाग नियंत्रकांची माहिती
 • ठाणे रेल्वे स्थानकातील आंदोलकांना पोलिसांनी हटवले, रेल्वे वाहतूक सुरळीत
 • अफवांवर विश्‍वास ठेवू नये. तसेच नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले
 • आजच्या बंदमध्ये पंढरपूरचा सहभाग नाही, ४ जानेवारी रोजी पंढरपूर बंदची हाक
 • दलितांमध्ये भीती, असुरक्षितता निर्माण झाली आहे, ही भावना दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणं गरजेचं आहे- मायावती
 • या घटनेची बसपा निंदा करत असून, याची चौकशी करण्यात यावी आणि जखमींना योग्य तो मोबदला देण्यात यावा- मायावती
 • यामागे मोठं षडयंत्र असून यात भाजप, संघाचा हात असल्याचा संशय आहे- मायावती
 • हे माहिती असताना पोलिसांनी तिथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यायला हवी होती, मात्र याकडे भाजप सरकारने लक्ष दिलं नाही- मायावती
 • ही घटना रोखता येऊ शकली होती, कारण इथे दरवर्षी हजारों माणसं शौर्यस्तंभाला भेट देत असतात- मायावती
 • बहुतांश शाळांनी सुटटी जाहीर केली.  महाविघालयांनी विध्याथ्याॆना कॉलेजला येऊ नका अशा सुचना दिल्या आहेत
 • महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर वारजे माळवाडी परिसरात स्कुल बस, व्हॅन , रिक्षाने शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना परत पाठविले
 • ठाण्यात तीन हात नाका इथे टीएमटीच्या बस अडवून धरल्या
 • मनमाड-लासलगाव बसवर दगडफेक, लासलगावमध्ये बस जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला
 • चेंबूरमध्ये खाजगी शाळेच्या बसची तोडफोड
 • सेक्टर ९, सानपाडा, नवी मुंबई येथीस रायन इंटरनॅशनल स्कूल बंद… शाळेबाहेर काही कार्यकर्ते उभे होते… त्यांनी सर्व पालकांना पाल्यांसह परत जाण्यास सांगितले
 • कल्याण-डोंबिवली , मुलुंड परिसरातील अनेक शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत
 • अंबरनाथ स्टेशन परिसरातही भीमशक्ती एकवटली, सरकार विरोधात घोषणाबाजी
   • पुणे आयुक्तांचे ट्विट, गरज असल्यासच रस्त्याने प्रवास करा

ठाण्यातील रेलरोको संदर्भातील ट्विट

 • औंरंगाबाद विद्यापीठाचे पेपर पुढे ढकलले
 • आज शाळा-कॉलेज बंद नाहीत, मात्र खबरदारी म्हणून अनेक शाळा-कॉलेज स्वत:हून बंद करण्यात आले
 • ठाण्यात सरकारविरोधात घोषणा देत आंदोलक रेल्वे रुळांवर उतरले, गाड्या अडवल्या
 • दुकानं, बाजारपेठाही बंद
 • मुंबईतील अनेक भागात पहाटेपासून शुकशुकाट, रिक्षा-टॅक्सी रस्त्यावर दिसल्या नाहीत