Live:- शिवसेना-भाजप ही सामान्य माणसाची शेवटची आशा आहे- उद्धव ठाकरे

devendra-uddhavji

राजेश देशमाने । अमरावती

 • 48 म्हणजे 48 सर्व जागांवर युतीच आली पाहिजे
 • सर्व्हे म्हणजे मतदान नाही, सर्व्हेवर माझा विश्वास नाही, मी आत्मविश्वासावर विश्वास ठेवतो
 • त्यांनी उभ्या केलेल्या हिंदुत्वाच्या वटवृक्षाला कीड लागू देऊ नका.
 • आज बाळासाहेब आणि अटलजी हे वैभव पाहायला पाहिजे होते
 • मी शिवसेना भाजप ओळखत नाही, मी फक्त भगवा ओळखतो
 • हिंदुत्वाचा पाईक असलेला पंतप्रधान तिथे बसवणं हे आमचं काम आहे
 • गारूडी येऊ द्या किंवा कोणी येऊ द्या सापाची अवलाद आपल्याकडे नाही.
 • आता जे करायचे ते मनापासून करायचे
 • सगळेच आपल्या पक्षात मग बोलायचं कोणावर?
 • आता पवारांना पक्षात घेऊ नका, कुणी तरी समोर ठेवा टीका करण्यासाठी
 • आता कुणावर टीका करण्याची असा प्रश्न पडला आहे
 • देशाचं भलं होण्यासाठी आपण एकत्र आलो, नाही तर आपल्या डोक्यावर कोण बसलं असतं
 • जर युती झाली नसती तर कुणाचं फावलं असतं
 • म्हणून युतीच आशा आहे
 • दहशतवाद्यांसमोर झुकणारे ते पूर्वीचे सरकार आपल्याला नको
 • आज आम्ही मजबूत आहोत, पुलवामा हल्ल्यानंतर प्रतिहल्ला करून ताकद दाखवली
 • पण शिवसेनाप्रमुख-अटलजी यांच्या पिढीने रक्त आटवल्याने हिंदुत्व टिकले
 • आधी हिंदू म्हणजे शिवी झाली होती
 • शिवसेना-भाजप ही सामान्य माणसाची शेवटची आशा आहे
 • सामान्य माणसाला मिळतं काय? सामान्य माणसाच्या आशेवर पाणी फिरू नये
 • जनतेचे मुद्दे उचलले आणि ते तुम्ही सोडवले
 • जे मुद्दे शिवसेनेने उचलले ते व्यक्तिगत नव्हते
 • असा बदल कसा झाला? असे विचारतात
 • आजही मी पंतप्रधानांना नरेंद्र भाई म्हणतो
 • पाच वर्ष राळ उठवली आणि यू टर्न घेतला असे बोलतात
 • भारतमातेसाठी शहीद होणाऱ्या नरवीरांची ही भूमी आहे
 • युतीत जो संघर्ष झाला त्यात विकासात अडथळा कधी होऊ दिला नाही
 • शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं जे आवडलं, जे पटलं ते बोलायचं
 • 25 वर्ष युतीची, पाच वर्ष संघर्षाची पुन्हा एकदा युतीची
 • गेले 15-20 दिवस झाले काय बोलावं कळत नव्हतं

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात

 • ती ताकद मोदींमध्ये आहे, ज्यांनी सांगितलं की जा आणि बदला घ्या
 • आमचे सैन्य कधीच कमजोर नव्हती, पण राजकीय नेतृत्वात ताकद नव्हती
 • मी शिकून मुख्यमंत्री झालो, अजित दादा तुम्ही कुठे राहिलात ते सांगा?
 • अजित पवारांनी माझ्यावर टीका केली, की पवार साहेब मुख्यमंत्री असताना मी नर्सरीत होतो
 • पवार साहेबांना हवेची दिशा कळते. ही बाब अशोकरावाच्याही लक्षात आली.
 • साहेबांनी 15 दिवसांत माघार घेतले. दुसऱ्या कॅप्टनने पत्नीला उभे केले
 • आमच्या समोर कोणताच कॅप्टन उभा राहत नाही
 • विरोधकांना आमच्या विरोधात बोलण्यासाठी काही मिळत नाही
 • जे प्रश्न बाकी आहेत ते सोडवण्याचे काम सुरू आहे, तशा योजना तयार आहे
 • सर्व प्रश्न सुटले असा आमचा दावा नाही पण अनेक प्रश्न सोडवले
 • मोदी सरकार, एनडीएच्या सरकारने पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन केले आहे
 • आपण निधड्या छातीने जनतेकडे जातो आहोत, आपण काम केले आहे
 • 20 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला
 • एकट्या महाराष्ट्रात 27 टक्के रोजगार निर्मिती झाली
 • मुख्यमंत्री ग्रामसडक मधून 30 हजार गावांपर्यंत रस्ते झाले
 • केंद्र सरकारने पाच वर्षात तुफान कामे झाली
 • जिथे कमळ असेल तिथे सर्व कमळाला मत देतील, जिथे धनुष्यबाण असेल तिथे सर्व धनुष्यबाणाला मत देतील
 • आता आपला धर्म एक, ती म्हणजे युती
 • आनंदराव तुम्ही काळजी करण्याची गरज नाही
 • लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका
 • शिवसेना-भाजप युती म्हणजे ‘फेविकॉल का मजबूत जोड, तुटेगा नही’
 • ही हिंदुत्ववादी पक्षांची युती आहे
 • ही दोन राजकीय पक्षांची, संघटनांची किंवा सत्तेसाठी झालेली युती नाही, ही विचारांसाठी झालेली युती आहे.
 • युती झाली तेव्हापासून ही लोकं बोलायलाच तयार नाहीय. यातील काही लोकांनी माघार घ्यायला सुरुवात केली आहे.
 • युती होऊ नये म्हणून अनेक लोकं देव पाण्यात घालून बसले होते
 • ही युती भविष्यातही राहणारी आहे
 • शिवसेना भाजप ही अभेद्य युती आहे
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू