Live : केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 16व्या लोकसभेच्या बरखास्तीचा ठराव मंजूर

153
modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रकृतीच्या कारणास्तव अरुण जेटली बैठकीला अनुपस्थितीत राहणार

 •  केंद्रीय मंत्रिमंडळाने 16व्या लोकसभेच्या बरखास्तीचा ठराव मंजूर केला
 • उद्या दिल्लीत एनडीएची बैठक. त्या पार्श्वभुमीवर भाजपध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला फोन. (वृत्तवाहिन्यांची माहिती)
 • 541 जागांचे निकाल जाहीर, 302 जागांवर भाजप विजयी, काँग्रेस 23 जागा

 • आतापर्यंत 535 जागांचे निकाल जाहीर, 301 जागांवर भाजप विजयी

 • केंद्रीय मंत्री परिषदेची आज संध्याकाळी बैठक, मोदींच्या शपथविधीची तारिख ठरणार

 • राज बब्बर यांनी उत्तर प्रदेशमधील पराभवाची जबबादारी स्वीकारत राहुल गांधींकडे पाठवला राजीनामा
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली मुरली मनोहर जोशींची भेट

 • लालकृष्ण आडवाणींचा घेतला आशिर्वाद

 • नरेंद्र मोदी व अमित शाह लालकृष्ण आडवाणींच्या निवासस्थानी पोहोचले

 • जम्मू कश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचे विजयाचे सेलिब्रेशन

 • भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा पुरी मतदारसंघातून पराभूत, बीजेडीचे पिनाकी मिश्रा 11 हजार मतांनी विजयी

 • 527 मतदारसंघाचे निकाल जाहीर, भाजप 298 जागांवर तर काँग्रेस 52 विजयी

 • रामपूर मतदारसंघातून सपाचे आझम खान विजयी, भाजपच्या जया प्रदा यांचा पराभव
 • जयपूर मतदारसंघातून राज्यवर्धन राठोड विजयी, तीन लाखांच्या मताधिक्यांनी मिळवला विजय
 • कॅनडाच्या पंतप्रधानांनी केले नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

 • आजची सकाळ अमेठीवासियांसाठी नवीन सकाळ, विकासावर दाखवला विश्वास – खासदार स्मृती इराणी

 • 512 जागांचे निकाल जाहीर, त्यातील 290जागांवर भाजप विजयी

 • अमेरिकेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

 • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी विजयाचा जल्लोष

 • देशभरातील 288 जागांवर भाजप विजयी, 15 जागांवर अद्याप आघाडीवर

 • काँग्रेस 50 जागांवर विजयी, 2 जागांवर आघाडीवर

 

आपली प्रतिक्रिया द्या