LIVE – राज्य मागासवर्गीय आयोगाची ३ आणि ४ ऑगस्ट रोजी बैठक

सामना ऑनलाईन, मुंबई

 • सोलापुरात मराठा आरक्षणासाठी महिला आक्रमक, सरकारची तिरडी काढून केला निषेध
 • वाचा सविस्तर : मराठा आंदोलन : मुखेड आगाराची बस पेटवली
 • ७ ऑगस्टला सरकार कोर्टात अहवाल सादर करणार
 • पाच संस्थांनी दिलेल्या माहितीचं विश्लेषण होणार
 • राज्य मागासवर्गीय आयोगाची ३ आणि ४ ऑगस्ट रोजी बैठक
 • संभाजीनगरमध्ये आंदोलक जलसमाधी घेण्याच्या तयारीत
 • हंगीरगा गावाजवळ एसटीमधून प्रवाशांना उतरवत एसटीवर दगडफेक
 • मराठा आरक्षणासाठी नांदेड येथील उमरी तालुक्यात रास्ता रोको
 • महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
 • संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्तारोको
 • मराठा समाजाच्या आंदोलनात देशमुख यांनी भाग घेतला होता
 • देशमुख यांना आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नव्हती, व्यवसायासाठी कर्जही मिळत नव्हतं
 • अभिजीत देशमुख(वय-३५ वर्ष) या तरुणाने आत्महत्या केली
 • बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात आणखी एका मराठा तरुणाची आत्महत्या
 • चाकण परिसरातील बहुतांश दुकाने आणि खासगी कार्यालये बंद
 • चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता
 • चाकणमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला
 • मंचर, नारायणगावला जाणाऱ्या एसटीची सेवाही बंद
 • चाकणमधील तणावामुळे एसटीची नगर आणि पुणे दरम्यानची बससेवा बंद
 • चाकण परिसरातील बससेवा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
 • मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता
 • राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक
 • विशेष पोलीस महासंचालक चाकणमध्ये दाखल
 • चाकणमधील पीएमपीएमलची बससेवा बंद
 • चाकणमधील आंदोलनामुळे ४ ते ५ हजार जणांवर गुन्हे दाखल
 • पुणे-नाशिकदरम्यानची बससेवा सोमवारपासून बंद
 • आज (३१ जुलै) चाकण परिसरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
 • चाकणमध्ये मराठा आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले