
सामना ऑनलाईन,मुंबई
- मुंबईमध्ये पावसाला पुन्हा सुरूवात
- मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरील दगडमाती हटवण्याचे काम पूर्ण, वाहतूक पूर्ववत
- रस्त्यावरील दगड-धोंडे, माती हटवण्याचं युद्धपातळीवर काम सुरू
- पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या २ लेन दरड पडल्याने बंद
- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटाजवळ दरड कोसळली
- नंदुरबारमध्ये डी.जे.अग्रवाल शाळेवर वीज कोसळली
- शाळेतील ५०० विद्यार्थ्यांचा जीव वाचला, कोणालाही इजा नाही
- अंजना नदीत वाहून गेलेल्या सचिन माकवनला वाचवण्यात यश, पठाण बेपत्ता
- कन्नड तालुक्यातील सारोळा गावात सचिन माकवन, सत्तार पठाण हे दोघेजण वाहून गेले
- गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातून गायब झालेल्या पावसाने नांदेडमध्ये हजेरी लावली.
- नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात
- नांदेड , अर्धापूर, लोहा, कंदाळ, मुखेड, नारतळा, मालेगााव, मुदखेड, बारड, भोकर या भागांत पाऊस पडला आहे.
- येत्या ४८ तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा
- लोकलच्या तीनही मार्गांवरची वाहतूक तूर्तास सुरळीत
- वसई, विरार परिसरातही पावसाचा जोर वाढला
- मालवणातील वायरी गावकरवाड्यातील दोन घरांना पाण्याचा वेढा

- मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्येही पावसाचा जोर
- संगमेश्वर, लांज्यामध्ये पावसाची संततधार
- ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातही मुसळघार पाऊस
- रत्नागिरी जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले
- २९ तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
- मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाला सुरुवात