LIVE-आमचे नाते खुर्चीशी नाही तर शेतकऱ्याशी !

सामना ऑनलाईन, नांदेड

 • शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत शिवसेनेचे संघर्ष सुरू राहील
 • २०१७पर्यंत तुम्हाला कर्जमुक्ती करावीच लागेल
 • कर्जमुक्ती कशी करायची याची जबाबदारी स्वीकारा
 • त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असताना शब्दांनी त्यांना घायाळ करू नका
 • शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची हौस नाही, ते दरोडेखोर नाही
 • सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाले पाहीजे, वीज २४ तास मिळाली पाहीजे
 • कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे
 • शेतकऱ्यांसोबत बसा, त्यांच्यासोबत बसून कायमस्वरूपी उपाय काढा
 • रिझर्व्ह बँक कर्जमाफीची मर्यादा २०१७ पर्यंत करू शकत नाही असं काही अधिकारी म्हणतात, पण जर सरकार पैसे भरणार असेल तर रिझर्व्ह बँकेला काय अडचण आहे
 • २०१७ पर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहीजे
 • सरकारी चालीत फसवू नका
 • शेतकऱ्यांना कर्जमुक्त करताना रडू नका
 • कर्जमुक्तीची साठीचे वर्ष २०१६ ऐवजी २०१७ करायचे आहे
 • ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ झालाय असं सांगण्यात येत आहे, ते देखील आपल्याला बघायला लागेल
 • ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी आपली आहे
 • हे जळजळीत सत्य आहे, यापुढे शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागू नयेत यासाठी उपाययोजना करण्याचे काम हाती घेतले जाईल
 • शेतकऱ्याच्या कष्टाला दाम मिळत नाही, जप्तीची नोटीस येते, कुटुंबाला वाचवू शकत नाही तो भंडावून जातो आणि आत्महत्येचं पाऊल उचलतो
 • शेतकऱ्याचे अनंत उपकार आहेत, त्यांना फूल ना फुलाची पाकळी का होईना आमची मदत करण्याची ताकद आहे
 • साले म्हणणाऱ्यांकडून, कर्जमुक्ती ही फॅशन झालीय असं म्हणणाऱ्यांकडूनच शिवसेनेने कर्जमुक्ती करून घेतली
 • मी सरकारकडून कर्जमुक्ती करून घेतली
 • काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने नुसती संघर्ष यात्रा काढली हाती काही लागलं का ?
 • सत्ता असो वा नसो आम्हाला काही फरक पडणार नाही
 • आम्ही सर्वसामान्य नागरिकांसोबतच आहोत
 • गेल्या १० वर्षापासून कर्जमुक्तीसाठी शिवसेना आंदोलन करीत आहे
 • किती शेतकरी कर्जमुक्त झाले याची यादी लावा
 • जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही
 • २०१७ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावंच लागेल
 • नांदेड येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा
 • कर्जमाफी शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय
 • सरकारला आमची मागणी मान्य करावी लागली
 • नाते खुर्चीशी नाही तर शेतकऱ्यांशी
 • कोसल्याचा फेटा, घोंगडी, काठी देवून स्वागत
 • उद्धव ठाकरे यांचे दणदणीत स्वागत
 • शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे नांदेडमध्ये