Live : मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, दहशतवाद्यांना घरात घुसून मारतो – मोदी

4
modi-uddhav

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील बीकेसीमध्ये प्रचंड सभा सुरू आहे

 • तुमचे प्रत्येक मत देशाला मजबूत करण्यासाठी मला बळ देईल – मोदी
 • जे कुणी पंतप्रधान पदाच्या रांगेत उभे आहेत त्यांच्यातील कोण दहशतवाद संपवू शकतो असे वाटते? मोदींचा सवाल
 • कर्नाटकात एक पक्ष फक्त 8 सीट लढवतेय व त्यांना पंतप्रधान व्हायचंय, मोदींची देवेगौडांना टोला
 • दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री व मुख्यमंत्री बदलण्याची संस्कृती बदलली आम्ही
 • मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, दहशतवाद्यांना घरात घुसून मारतो – मोदी
 • दिल्लीत शानदार पोलीस मेमोरियल तयार केले आहे.
 • काँग्रेसने कधीच त्यांच्या मानसन्मानाची फिकीर नाही केली.
 • लोकांची सेवा करता करता 33000 पोलीस शहीद झाले आहेत.
 • आणि अशा सेवा करणाऱ्या पोलिसांना लोकं मारतात.
 • कोणताीही सण असो, ऋृतू असो पोलिसवाले आपल्या संरक्षणासाठी उभे असतात.
 • सध्या पोलिसांसोबत वाद घालण्याची फॅशन झालीय.
 • शहीद जवानांसाठी एक राष्ट्रीय स्मारक बनले पाहिजे.
 • वरिष्ट नेते भ्रष्टाचारात व्यस्त असतात त्यावेळी शत्रूची ताकद वाढते
 • हे सर्व हल्ले काँग्रेसच्या काळात झाले. त्यावेळी त्यांनी फक्त मंत्री बदलले व बयानबाजी केली.
 • मुंबई शहर हे शत्रूंच्या नजरेला खटकत असते. त्यामुळे दहशतवाद्यांनी सतत हल्ले केले.
 • काँग्रेस ही महामिलावटी सरकार आहे – मोदी
 • आम्ही ज्या वेगाने काम करतोय त्याने येत्या काही काळात 300 किलोमीटरचे मेट्रो रेल तयार होईल
 • काँग्रेसच्या काळात फक्त 11 किलोमीटर मेट्रो रेलचे काम केले
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई फर्स्टचा नारा
 • 2014 पर्यंत महागाई 10% ने वाढत होती ती आता 4% ने वाढतेय
 • गेल्या पाच वर्षात आम्ही टॅक्स नाही वाढवला तर टॅक्स देणाऱ्यांची संख्या वाढवली – मोदी
 • ज्यांनी देशाला लुटलेय त्यांना सर्व परत करावे लागेल – मोदी
 • गेल्या 5 वर्षात भ्रष्टाचाराच्या बातम्या वृत्तपत्रातून गायब झाल्या आहेत. – मोदी
 • आमचे विचार, धोरणं ही काँग्रेसपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत – मोदी
 • काँग्रेस एका कुटुंबाचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी लढतेय – मोदी
 • काँग्रेसचा जाहीरनाम्यात एकदाही मध्यमवर्गाशी संबंधित काहीही लिहलेले नाही
 • मध्यमवर्गाची लोकं फार स्वार्थी असतात असे काँग्रेसचे मानने आहे. हा मध्यमवर्गाचा अपमान आहे – मोदी
 • मला मोठेच विचार करायला येतात, मी छोटे छोटे विचार नाही करू शकत – मोदी
 • मध्यमवर्गीयांचे देश उभारणीत मोठं योगदान – मोदी
 • अनेकांनी गॅसची सबसिडी सोडल्यामुळे आज गावातील महिलांना त्यांचा फायदा झाला – मोदी
 • माझ्या एका सांगण्यावरून 40 लाख लोकांनी रेल्वेची सबसिडी सोडली – मोदी
 • मध्यम वर्गातील लोकांचे मी विशेष आभार मानतो. तुमच्या पाठिंब्यामुळे हा चौकिदार देशासाठी काम करतोय – मोदी
 • कोळी बांधवांचे, डब्बेवाल्यांचे, टॅक्सी चालकांचे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आभार मानायला आलोय – मोदी
 • मुंबईत नेहमी आम्हाला समर्थन मिळालंय, त्यासाठी मी मुंबईकरांचे आभार मानायला आलोय – मोदी
 • लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्यांचे आता काहीही चालणार नाही – मोदी

 • काँग्रेस म्हणजे कन्फ्युजनचे दुसरे नाव – मोदी
 • वृत्तपत्रात फोटो आला म्हणजे मतदार मतदान करत नाही – मोदींचा विरोधकांना टोला
 • समजादारी तुमचं मत वाया घालवण्यात आहे की ते योग्य व्यक्तीला देण्यात आहे – मोदी
 • देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसला महात्मा गांधींनी विसर्जित करायला सांगितली होती. त्या काँग्रेसची आज काय अवस्था आहे.
 • भाजपला लोकसभेत सर्वाधिक जागा मिळणार
 • 2019 च्या निवडणूकीच्या सर्वेक्षणात सर्वांचे एकमत आहे की भाजप बहुमताची सरकार बनवणार
 • जे नेते अजुनही बुरसटलेल्या विचारांचे आहेत ते नव्या मतदारांचे विचार समजू शकत नाही, मोदींचा विरोधकांना टोला
 • गरिबी हटावच्या खोट्या आश्वासनांची हि निवडणूक नाही तर गरिबांनी सशक्त करण्याची निवडणूक आहे.
 • ही निवडणूक फक्त एक सरकार निवडण्यासाठी नाही तर हिंदुस्थानची दिशा ठरविणारी निवडणूक आहे.
 • आपली संस्कृती हीच हिंदुस्थानची शक्ती – मोदी
 • काशीला आलात त्यासाठी विशेष करून उद्धव ठाकरे यांचे आभार – मोदी
 • छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना केले वंदन
 • शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे माझे लहान भाऊ – मोदी
 • मोदींनी मराठीतून केली भाषणाला सुरुवात
 • मोदींनी दिल्या भारत माता की जय च्या घोषणा
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात
 • मोदीजी तुम्ही चिंता करू नका, शिवरायांचा महाराष्ट्र तुमच्या पाठिशी उभी राहणारच – उद्धव ठाकरे
 • अयोध्येत राम मंदिर बांधणार – उद्धव ठाकरे
 • विरोधकांना फक्त पंतप्रधान पदाची खुर्ची हवी आहे.
 • मी कधीच चोरून मारून कोणतीही गोष्ट केलेली नाही. आम्ही समविचारी आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत.
 • जेएनयूत देश के तुकडे होंगे घोषणा देणारी औलाद वळवळतेय, त्यांना फासावर लटकवायचं नाही तर काय करायचं
 • हिंदुत्त्व हा आमचा विचार आहे
 • कश्मीर या हिंदुस्थानचं आहे –
 • “माझ्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला ‘वंदे मातरम्’ हा मंत्र देणाऱ्या बंगालमध्ये बांगलादेशमधून कलाकार आणून प्रचार करावा लागतो, मत मागावी लागतात. कोणत्या दिशेने देश नेणार आहात तुम्ही?”
 • कश्मीरमधलं 370 कलम काढणारच – उद्धव ठाकरे
 • आमचे पंतप्रधान पाकिस्तानचं कंबरडं मोडून टाकतील
 • यांचं सरकार आलं तर देशाचं वाटोळं होईल
 • जी लोकं मनाने एकत्र येत नाही ती देशाची लढाई लढायला एकत्र कशी येऊ शकतील
 • शरद पवारांना राहुल गांधी सोबत व्यासपिठावर एकत्र यायचे नाही
 • आम्ही युतीचे सर्व नेते एकत्र येतो, आमच्या सभेला जनसागर लोटतो, याचा मला अभिमान आहे
 • अजुनही आपल्याला संपविण्यासाठी जे 56 नेते एकत्र आले आहेत ते कधीच सभेसाठी एकत्र आले नाहीत
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
 • 2019 ची निवडणूक आम्ही आमच्या कामांवर जिंकणार आहोत – मुख्यमंत्री
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सभास्थळी आगमन
 • मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सभेसाठी हजर

 • शिवसेना नेते मनोहर जोशी, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, रिपाई अध्यक्ष रामदास आठवले, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर मंचावर उपस्थित
 • शिक्षण मंत्री विनोद तावडेंचं भाषण सुरू

bkc-stage-1

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगमनाची उत्सुकता
 • सभेच्या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी
 • सभास्थळी महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी