भाजप म्हणजे २५ वर्षे पोसलेला नागोबा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

सामना ऑनलाईन । ठाणे

शिवसेनेने २५ वर्ष भाजपशी एका तत्त्वासाठी युती केली होती. मात्र आता लक्षात आलं की २५ वर्ष आपण नागोबा पोसला आणि आता त्यानेच आपल्यावर फणा काढला, पण त्या नागोबाचं काय करायचं ते आम्ही आता दाखवून देऊ, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

ठाण्यात शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा महापौर असच चित्र आपल्याला कायम पाहायला मिळायचं. मात्र राबायचा कोण? प्रचार कोण करायचा फक्त शिवसैनिक. भाजपला याआधी कधी प्रचार करताना पाहिले आहे का?, असा खणखणीत सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे सोंग उघडे पाडले. माझं जाहीर आव्हान आहे की तीर्थप्रसादाचा बोर्ड लावा आणि एका बाजूला रक्तदानाचा बोर्ड लावा, तर भाजपवाले तीर्थप्रसादाला भाजपवाले जातील आणि शिवसैनिक रक्तदानाला, असा सणसणीत टोला त्यांनी यावेळी लगावला.

ठाण्यात प्रचारासाठी नाही ठाणेकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो

ठाण्यात मी प्रचारासाठी आलेलो नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मागे ठाण्यात ठाणेकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. तसाच मी देखील प्रचारासाठी तर ठाणेकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदींच्या जाहिरातींवर मंगळयानाहून अधिक खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिराती जोरदार सुरू आहेत. पण ते पैसे कुणाचे? तुमचे-आमचे. आणि हे फक्त जाहिराती करत फिरताय. मोदींच्या जाहिरातीवर मंगळयानाहून अधिक खर्च झाला आहे, अशी माहिती आता समोर येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

अमिताभ-मोदी-देवेंद्र लस्सी

एक लस्सीचा जोक सध्या फिरतोय. एका लस्सीवाल्याकडे तीन प्रकारची लस्सी मिळते अमिताभ-मोदी-देवेंद्र लस्सी. अमिताभ म्हणजे पूर्ण मलाई मारके लस्सी, मोदी लस्सी म्हणजे नाव लस्सी पण आतामध्ये ताक मिळणार आणि देवेंद्र लस्सी म्हणजे ‘पारदर्शक’ नुसता ग्लास मिळणार आतमध्ये काहीच नाही. (हशा आणि टाळ्या)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेतील महत्वाचे मुद्दे

२५ वर्ष आपण हा नागोबा पोसला जो २५ वर्षानंतर फणा काढून आपल्यावर येतोय, तर मग ही शिवशंकराची सेना आहे

=======

मतदारांनी तुम्हाला मतदान केले ते चिक्कीवाटप नव्हते

=======

सत्ता आल्यानंतर तुम्ही का शब्द पाळत नाही?

=======

साडेसहा हजार कोटींचं पॅकेज कल्याण-डोंबिवलीकरांना शब्द दिला, एक नवा पैसाही दिला नाहीये

=======

मोदींच्या जाहिरातींचा खर्च अकराशे कोटी आहे जो मंगळयानापेक्षा जास्त आहे

=======

मला नोटाबंदीचा फटका बसला आहे, कारण माझ्या गोरगरीब माता भगिनी बँकेच्या रांगेत उभे होते, जे मला सहन न झाल्याने फटका बसला, लग्न मोडल्याने मला फटका बसलाय.

=======
मुख्यमंत्री आणि आयुक्तांची जवळीक असल्याने एखाद्या गुंडाने भाजपात पद मिळवण्यासाठी वशिला लावला नसेल हे कशावरून ?
=======
जैसवाल यांनी मध्यरात्री थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला, म्हणजे ही जवळीक नाही का ?
=======
जैसवाल यांना सरकारने नेमलं आहे, नागरिकाला धमकी आली तर ते पोलिसांकडे जातात, त्यांनी जास्तीत जास्त पोलीस आयुक्तांना सांगायला हवं होतं.
=======
मनोज म्हात्रेच्या मारेकऱ्यांना पकडा आणि तसंच भरचौकात ठेचा
=======
कलानीना सोबत घेतल्यानंतर अशा घटना होणार नाही तर मग काय होणार
=======
भाजपा उपाध्यक्षाने मनोज म्हात्रे यांची भिवंडीमध्ये हत्या केली, हे सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून होतोय, जो फरार आहे
=======
मुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसात सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभरात काय कारभार केला हे सांगा
=======
शंकर नेत्रालय आशियातले सगळ्याच मोठे डोळ्याचे हॉस्पीटल असेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहीले तर त्यांचे डोळे इथे पहिले तपासा
=======
मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आम्ही जिंकणारच आहोत, तुम्ही किमान शहराची अब्रू घालवू नका, मुंबईची तुलना पाटण्याशी करू नका
=======
गोपीनाथ मुंडे पप्पू कलानीला रावण म्हणाले होते, आता तुम्हाला रावण प्यारा झाला ?
=======
शिवसेना सोबत नसती तर तुम्हाला खुर्चीचं स्वप्न पडलं असतं का ?
=======
शिवरायांचे मर्द मराठे तुमच्या सोबत होते शिवरायांचा भगवा झेंडा तुमच्या सोबत होता…तो तुम्हाला नकोसा झाला, या गुंडांमुळे ?
=======
इतक्याशा जागेत सभा घेऊन तुम्ही आम्हाला खंडणीखोर म्हणता ?
=======
मुख्यमंत्र्यांच्या नुक्कड सभा होतायत,
=======
हा हिंदुस्थान कालपरवाच जन्माला आला आणि देशाचे राष्ट्रपिता हे नरेंद्र मोदीच आहेत असेच हे वागतायत
=======
यापूर्वी कधीही भाजपाने प्रचार केला असेल असं मला वाटत नाही
=======
व्यापारी म्हणतायत एक ही भूल कमल का फूल
=======
काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आणि आज मराठा समाजाच्या संघटनेने पाठिंबा दिलाय
=======
जो तो हेच म्हणतोय की युती तोडलीत छान केलंत
=======
२५ वर्षात पहिल्यांदा हे सगळे चेहरे माझ्याशी बोलत असतील
=======