आमच्या टेकूशिवाय तुमची खुर्ची टिकली नसती, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

सामना ऑनलाईन । पुणे

देवेंद्र फडणवीस म्हणाले की युती तुटल्यामुळे मुख्यमंत्री झालो. पण आमचा टेकू लागला नसता तर तुमची खुर्ची टिकली नसती, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

‘सामना’वर बंदी ही आणीबाणी नाही? उद्धव ठाकरे यांचा खणखणीत सवाल

भाजपने म्हणे निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे की १६, २० आणि २१ फेब्रुवारीला ‘सामना’वर बंदी आणा. सामनासारख्या वृत्तपत्रावर बंदी ही आणीबाणी नाही? मग कोणत्या तोंडाने तुम्ही इंदीरा गांधीवर टीका करता? आणि मग तुमचे मुख्यमंत्री-पंतप्रधान बोंबलत फिरतात त्याचे काय? सामनावर बंदीची भाषा करतात, मग १६, २० आणि २१ तारखेला त्यांच्या तोंडातही बूच मारा, अशा खणखणीत शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हल्ला केला.

शिवसेना द्वेषापायी भाजपने शिवरायांचा झेंडा कापला

भाजपच्या मनात शिवसेनेविषयी द्वेष आहे. त्यामुळे यांनी शिवस्मारकाच्या जलपूजनावेळी यांनी शिवरायांच्या झेंडा कापला, की शिवसेनेचा झेंडा वाटायला नको. द्वेषापायी शिवरायांचा झेंडा कापला हा शिवरायांचा अपमान आहे. जे शिवसेनेच्या द्वेषापायी शिवरायांचा झेंडा कापता, ते काय शिवस्मारक उभारणार?, असा खणखणीत सवाल त्यांनी केला.

त्यांची लाट नाही, तर विल्हेवाट

दिल्ली, पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, बिहार सगळीकडे यांना दारूण पराभव पाहायला लागला. लाट कुठे गेली? दिल्लीत तर ६० पैकी केवळ ३ जागा. ही लाट?… नाही ही लाट नाही विल्हेवाट आहे, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मारला.

गाजरं दाखवणं एवढच यांचं काम

निवडणुका आल्याकी हे गाजर दाखवलं. कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकांच्या वेळी ६ हजार कोटी रुपये देऊ सांगितलं. पण एक कवडी दिली नाही. मुंबईतही काँग्रेसने आणलेल्या मेट्रोचे फोटो हे यांच्या वचननाम्यावर छापता. त्यांनी पुण्यातही मेट्रो-मेट्रो केलं पण पर्यावरणारचं काय? पर्यावरणाचा ऱ्हासकरून आम्हाला विकास नको आहे. पण हे फक्त गाजरं दाखवतात आणि मत मागतात, असा टोला त्यांनी लगावला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे अभिनंदन

भाजपला वाटताय त्यांची लाट आहे. पण ही लाट विधानसभेच्यावेळी संपली. आमच्या शिवरायांच्या महाराष्ट्रानेच ती संपवली. शिवसेनेनं लाचारी पत्करलेली नाही. तशीच भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली, त्यामुळे त्यांचे अभिनंदन. लाचारी न पत्करता स्वाभिमानाने ते आमच्या सोबत आले, असेही ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:

‘सामना’ आणि कशाकशावर बंदी शिवरायांच्या महाराष्ट्रात शक्य नाही

==============

काँग्रेसचा अनुभव घेतलाय,राष्ट्रवादी काँग्रेसचे भोग भोगले आहेत, भाजपाचे परिवरत्न देखील तुम्ही बघितलं

==============

बापट यांनी पारदर्शकतेची शपथ घेऊन ते खरं बोलले की देवेंद्र फडणवीसांच्या काळात ६५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

==============

मुंबईतील महापालिका आयुक्तांची शेरे ऑनलाईन उपलब्ध आहेत, तसे मुख्यमंत्र्यांचे किंवा सचिवांचे शेरे आहेत, दाखवा

==============

एकहाती सत्ता येऊनही समान नागरी कायदा तुम्ही करू शकत नाही ?

==============

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्यास मी भाजपाला जाहीर पाठींबा देईन,पण हे(भाजपा) करणार नाहीत

==============

नोटाबंदीने नेमकं साध्य केलंत काय?

==============

काल दोन जवान शहीद झाले, जवळपास २५ ते २६ जवान नोटाबंदीनंतर शहीद झालेत

==============

तुमची नोटाबंदीची पद्धत क्रूर आहे हे मी सांगितलं

==============

खडसेंना फसवलं आणि आता त्यांनाच खड्यासारखं बाजूला टाकून दिलं

==============

मुंबई वाचवणाऱ्या शिवसैनिकांची तुलना कलानीबरोबर करू शकतो का ?

==============

श्रीकृष्ण आयोगाने जे गुन्हा दाखल केले होते ते सगळे शिवसैनिक होते, त्यात भाजपाचे कोणी नव्हते

==============

गुंड किती आहेत मोजा, माझे आव्हान आहे तुम्हाला

==============

तुमच्या विरोधात बोलणारे भ्रष्ट आणि सलगी करणारे गुणी बाळ

==============

लोकसभा,विधानसभा निवडणुकीत याच भाजपाला नॅचुरली करप्ट पार्टी म्हटलं होतं मात्र निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की पवार हे माझे गुरू आहेत

==============

ते भ्रष्टाचाराचे महामेरू आहे का पद्मविभूषण ?

==============

शरद पवार आहेत तरी कोण हा मला प्रश्न पडलाय

==============

जलपूजनाच्या कार्यक्रमात भाजपाने शिवसेना द्वेष दाखवला, त्यांनी शिवरायांचा झेंडा कापला आणि पताकेसारखा झेंडा लावला

==============

सामनावर बंदी घालायची आणि तुमचे मुख्यमंत्री, पंतप्रधान बोंबलत फिरणार..त्यांच्याही तोंडात १६,२०,२१ फेब्रुवारीला बूच मारा

==============

भाजपाने निवडणूक आयोगाकडे १६,२०,२१ तारखेला सामना छापायला बंदी घाला अशी मागणी केली आहे, मग कोणत्या तोंडाने तुम्ही इंदीरा गांधीवर टीका करता ? ही आणीबाणी नाही का ?

==============

तुम्हाला गुंड घ्यावे का लागतात ? जुन्या जाणत्या संघाच्या लोकांनी भाजपाच्या या परिवर्तन किंवा वर्तनासाठी त्यांचे आयुष्य वाहीलं का ?

==============

बिहारमध्ये नितीशकुमार, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी,तमिळनाडूमध्ये जयललिता जिंकल्या, मग कुठे गेली तुमची लाट ?

==============

मग दिल्लीत ६० पैकी ३ जागा आल्या, वाट लागली….नाही विल्हेवाट लागली

==============

भाजपाचा उधळलेल्या अश्वमेध शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण अडवला

==============

भाजपाबरोबर युती झाली तेव्हा भाजपाचे फक्त दोन खासदार होते

==============

तुमची हवा विधानसभेच्या निवडणुकीतच संपलेली आहे, लोकसभा निवडणुकीत ती जरूर होती

==============

आम्ही हलवायचं दुकान काढलेलं नाही, तुम्ही जागा मागायच्या आणि आम्ही द्यायच्या

==============

समान नागरी कायदा करू, राम मंदिर करू असं कितीवेळा सांगितलं

==============

आमचा टेकू लागला नसता तर तुमची खुर्ची टीकली नसती

==============

तुम्ही (भाजपा) जे करताय ते जनतेच्या मुळावर येणार असेल तर मी सडकून वार करणारच

==============

मी व्यक्तीवर नाही वृत्तीवर टीका करतोय

==============

खोटे आरोप करायला लाज,लज्जा,शरम वाटत नाही?

==============

यापुढे युती नाही, अजिबात नाही, आता कोणाच्याही उपकाराचं ओझं आमच्या शिवसैनिकांच्या पाठीवर नको

==============

जर मित्र माझ्या राज्याच्या राजधानीची अवहेलना करत असेल तर मैत्री गेली खड्ड्यात

==============

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अभिनंदन करतो, ते लाचारी न पत्करता स्वाभिमानाने आमच्या सोबत आले

==============

खा…खा…लागली आहे,जेवढी भूक आहे तेवढंच खा

==============

तुम्ही समोर उभे येऊन राहीला आहेत,लढायचं नाही ?

==============

त्यांच्याकडे सगळे बृहन्नडाच आहेत

==============

मी पण जाहीर करतो माझं पण सेटींग आहे, माझं जनतेबरोबर सेटींग आहे

==============

कोणाचं कोणाबरोबर सेटींग आहे हे कळत नाही