‘विकास’नंतर ‘प्रकाश’ गायब; लोडशेडिंगनंतर जोक्सचा महापूर!

सामना ऑनालाईन । मुंबई

विकासाच्या गोष्टी करणाऱ्या भाजप सरकारच्या काळात तमाम महाराष्ट्रातील नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. वीजेच्या टंचाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच शहरात लोडशेडिंग सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधील उष्णतेच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना लोडशेडिंगचा शॉक लागला आहे. भांडुप, मुलुंड, नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिव्यातही रोज सव्वा तीन ते सात तास वीज लोडशेडिंग लागू करण्यात आलं आहे. कालपासून हे लोडशेडिंग लागू झालं आहे.

आघाडी सरकारच्या काळातील लोडशेडिंगवर भाजपने चांगलं तोंडसुख घेतलं घेतलं होतं. त्यावेळी व्हॉट्सअप, फेसबुकवर यासंबधीचे अनेक जोक फिरत होते. तसेच जोक आता फिरू लागले सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. तसेच #अच्छे_दिन #लोडशेडिंग असे हॅशटॅगही फिरू लागले आहेत.

निवडक व्हायरल पोस्ट्स

acche-din-advt-1acche-din-advt-2

acche-din-advt-3