Lok sabha 2019 माजी मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री निवडणूक लढणारही नाही व प्रचारातही नाहीत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला असून सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. यंदा लोकसभेच्या इतिहासात आपली छाप उमटवणारे अनेक दिग्गज संसदेत दिसणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपच्या केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, बुलंद तोफ उमा भारती यासह अनेक नेते निवडणुकीमध्ये उभे राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यात आणखी एक नाव ते म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव हे.

lalu-laughing

Lok sabha 2019 देशाचे चार दिग्गज नेते यंदा लोकसभेच्या रिंगणात नसणार!

प्रमुख भाजपविरोधी नेते म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यंदा निवडणूक प्रचारात दिसणार नाहीत. चारा घोटाळ्यामध्ये अडकलेल्या लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आणि त्यांची तुरुंगामध्ये रवानगी झाली. त्यामुळे ते यंदा निव़डणूक लढवताना दिसणारही नाहीत आणि प्रचारातही दिसणार नाहीत

Lok sabha 2019 मायावतींना पंतप्रधानपदाची शपथ घेताना पाहायचंय, ‘गब्बर सिंह’ची इच्छा

1977 मध्ये बिहारच्या छपरा मतदारसंघातून लोकसभेत जाणाऱ्या लालूंनी 1990 ते 1997 या कालावधीत बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. तर 2004 ते 2009 या कालावधीत युपीएतुन केंद्रीय रेल्वेमंत्रीपद सांभाळले होते.