कार्यकर्त्यांचा राडा पाहून नवनीत राणा ढसाढसा रडल्या

सामना ऑनलाईन । अमरावती

अमरावतीमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत त्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये पठाण चौक इथं हाणामारी झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. हा प्रकार नवनीत राणा यांच्यासमोर घडल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला. या ठिकाणावरून परत जात असताना राणा यांना रडू कोसळले. याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

अमरावती येथील पठाण चौकात नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यासह पठाण चौक येथे पोहोचल्या होत्या. याचवेळी माजी नगरसेवक आसिफ तवक्कल शेखावत यांना सोबत का आणले असे म्हणत नवनीत राणा यांच्याशी वाद घातला. ही बाब शेखावत यांच्या समर्थकांना माहिती कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यामुळे नवनीत राणा यांना रडू कोसळले. शेवटी नवनीत राणा आणि रावसाहेब शेखावत यांना प्रचार अर्ध्यावर सोडून निघून जावे लागले.