Lok sabha 2019 पराभव समोर दिसू लागल्यानेच पवारांची माघार – गडकरी

nitin-gadkari

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हो-हो, नाही-नाही करता करता अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार नसल्याच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, पराभव समोर दिसू लागल्याने त्यांनी माघार घेतली.

Lok sabha 2019 : वाऱ्याची दिशा बदलल्यानेच शरद पवार यांची माघार

माढामधून शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा वेळापत्रक जाहीर होण्याच्या आधीपासून सुरू होती. शरद पवार यांनी देखील आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. परंतु एकाच घरातून किती लोकांनी निवडणूक लढवायची? असे म्हणत पवार यांनी निवडणूक लढणार नसल्याचे म्हटलं. यावर बोलताना गडकरी म्हणाले की, शरद पवारांना पराभवाचा अंदाज आल्यानेच त्यांनी लोकसभेतून माघार घेतली आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

शरद पवारांची ऑफर धुडकावली, गणेश नाईकांचे नाय… नो… नेव्हर

एअर स्ट्राईकचे राजकारण नाही
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला आणि जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले. वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकवरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याबाबत बोलताना गडकरी म्हणाले, एअर स्ट्राईकचे राजकारण आम्ही केले नाही करणार नाही. तसेच मोदींच्या वक्तव्याचे समर्थन करताना ते म्हणाले की, राफेल विमान असते तर एअर स्ट्राईक दुरून करता आले असते. दीडशे किलोमीटर दुरून अतिरेक्यांच्या ठिकाणावर वार करता आला असता.

Lok Sabha 2019 : 1991 ची पुनरावृत्ती होणारच, शरद पवारांचा विश्वास