Lok Sabha 2019 पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली

100

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशभरातील जनतेने एनडीएच्या बाजूने कौल दिलेला असल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. राहुल यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.

राहुल गांधी यांन काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचे सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निराश न होण्याचे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या