चंद्राबाबू यांची मोर्चेबांधणी सुरूच, ममता बॅनर्जींची घेतली भेट

101

सामना ऑनलाईन । कोलकाता

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सोमवारी भेट घेतली आहे. कोलकातामधील कालीघाट परिसरातील ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी चंद्राबाबू यांनी त्यांची भेट घेतली.

अखिलेश यादव मायावतींच्या भेटीला, पुढचे पाऊल उचलण्याचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी चंद्राबाबू यांनी भाजपइतर पक्षांच्या नेत्यांच्या भेटी-गाठींचा सपाटा लावला आहे.

लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाआघाडीचे नेते रणनीती आखत आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी महाआघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. चंद्राबाबूंनी शनिवारी राहुल गांधी, शरद पवार, मायावती आणि अखिलेश यादव यांना भेटले होते. तसेच शुक्रवारी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती.

आपली प्रतिक्रिया द्या