महायुतीने दक्षिण मुंबई राखली, ‘आपला माणूस’ अरविंद सावंत पुन्हा दिल्लीत

127

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने दक्षिण मुंबईची जागा सलग दुसऱ्यांदा जिंकली. मुंबईमधील महायुतीची ही जागा धोक्यात आहे अशा वावडय़ा उठवणाऱ्या विरोधकांना मतदारांनी मतपेटीमधून चांगलीच चपराक दिली. महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत हे चार लाखांपेक्षा अधिक मते मिळवून सलग दुसऱ्यांदा 4 लाख 21 हजार 937 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला.

मुंबईतील लोकल रेल्वे सेवेमध्ये सुधारणा व्हावी, गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावीत आदी अनेक प्रश्नांसाठी अरविंद सावंत यांनी लोकसभेत उठवलेला आवाज, ‘उत्कृष्ट खासदार’ म्हणून त्यांचा झालेला गौरव हे फॅक्टर सावंत यांच्या विजयात महत्त्वाचे ठरले. दरम्यान, मलबारहिल येथील मताधिक्याचा सावंत यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता, अशी माहिती माजी खासदार मोहन रावले यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या