बीडचा सस्पेन्स, बडे नेते परतीच्या प्रवासात

127

सामना प्रतिनिधी । बीड

बीड लोकसभा मतदार संघाचा निकाल काय असणार? धडधड वाढली, सस्पेन्स कायम, मतमोजणीला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू असतांना जिल्ह्यातील बडे नेते बीडकडे कूच करत आहेत. पंकजा मुंडे बीडच्या वाटेत आहेत, तर धनंजय मुंडे गुरुवारी दुपारी बीडमध्ये दाखल होतील.

बीड लोकसभा निवडणूक काट्याची झाली. विजयाची माळ कोणाच्या गळयात पडणार? गुलाल कोण उधळणार? प्रतीक्षा संपली, सस्पेन्स वाढला, निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली, कार्यकर्त्यांची मतमोजणीला जाण्याची लगबग सुरू झाली, कर्मचारी केंद्रावर दाखल झाले, निकालासाठी यंत्रणा सज्ज झाली, बडे नेते बीडमध्ये दाखल होत आहेत. अनेक नेते परतीच्या प्रवासाला लागले आहेत. विद्यमान खासदार बीड जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे बीडकडे निघाल्या आहेत. आठ वाजेपर्यंत त्या जिल्ह्यात दाखल होतील. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे गुरुवारी निकालाचा अंदाज बघून बीडकडे दुपारी येतील. जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेशानंतर रात्री उशिरा बीड कडे कूच करणार आहेत. बजरंग सोनवणे, प्रकाश सोळुंके जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अमरसिंह पंडित , आमदार सुरेश धस रात्री बीडमध्ये येणार आहेत. संदीप क्षीरसागर बीडमध्ये पोहोचले आहेत. आमदार आर टी देशमुख, बदामराव पंडित हे ही रात्री बीड जिल्ह्यात दाखल होतील.

आपली प्रतिक्रिया द्या