बुलढाण्यात शिवसेनेचा भगवा फडकला, प्रतापराव जाधव यांची विजयाची हॅटट्रिक

193

सामना ऑनलाईन । बुलढाणा

बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेच्या जाधव प्रतापराव गणपतराव हे विजयी झाले आहेत. जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा विजयाची मोहोर उमटवली आहे. जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला.

2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जाधव प्रतापराव गणपतराव यांनी विजय मिळवला होता. त्यांना 5,09,145 मतं मिळाली होती, तर त्यांचे विरोधक इंगळे कृष्णराव गणपतराव (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 3,49,566 मतं मिळाली होती. 2009 मध्ये झालेल्या 15 व्या लोकसभा निवडणुकीत येथे शिवसेनेचे जाधव प्रतापराव गणपतराव यांनी विजय मिळवला होता. जाधव प्रतापराव गणपतराव यांना 3,53,671 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. शिंगणे राजेंद्रराव भास्करराव यांना 3,25,593 मतं मिळाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या