कॅप्टननेच पळ काढला तो पक्ष काय लढणार, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला

devendra-fadanvis-in-ambejo

राजेश देशमाने । बुलढाणा

ज्या पक्षाचा कॅप्टन प्रथम फलंदाजीला उतरणार होता त्या कॅप्टननेच पळ काढल्यानंतर तो पक्ष काय लढणार, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाण्यातील सभेत बोलताना लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुलढाणा येथे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच मोदी सरकारच्या काळात महायुतीने केलेली कामेही सांगतली.